नाशिक - सुरत महामार्गावर सापुतारा घाटात खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 15 जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. पहाटे साडेपाच वाजता अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
कुंभमेळ्यावरून परतताना भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला. 15 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आज पहाटे 5 : 30 वाजेच्या दरम्यान अपघात झाला. भीषण अपघातात बसचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असताना अपघात झाला. अपघात झालेल्या बस मधील सर्व मयत आणि जखमी मध्य प्रदेश मधील असल्याची माहिती मिळत आहे.
सातपुडा घाटात 200 फूट खोल दरीत बस कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की बसचे दोन तुकडे झाले. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भीषण अपघातात बसचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असताना अपघात झाला. अपघात झालेल्या बस मधील सर्व मयत आणि जखमी मध्य प्रदेशमधील असल्याची माहिती मिळत आहे.
