शिवराज चौहान यांचा रडताना Video व्हायरल;

शिवराज चौहान यांचा रडताना Video व्हायरल;

belgavkar.com | belgaum | belgavkar

मुख्यमंत्री पद गमावल्याने दुःख झाल्याची चर्चा, मुळात घडलं काय?

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी भाजपने सोमवारी नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव घोषित केले आहे. उज्जैन दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन यादव हे मध्य प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री असतील. आमदार यादव हे चार वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलेल्या शिवराज सिंह चौहान यांची जागा घेतील. मोहन यादव यांनी शिवराज चौहान यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा भूषवले होते. मध्यप्रदेशमधील सत्तेची सूत्र यादव यांच्या हाती जाताच आता शिवराज सिंह चौहान यांचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. यामध्ये शिवराज सिंह चौहान हे रडताना दिसत आहेत. मुख्यमंत्रीपद गमावल्याच्या दुःखात चौहान यांना अश्रू आवरता आले नाहीत असा दावा या व्हिडीओसह करण्यात आला आहे.
काय होत आहे व्हायरल? : ट्विटर यूजर Amock ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला. इतर युजर्सही व्हायरल व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास : व्हिडिओचे बारकाईने निरीक्षण करून आम्ही आमचा तपास सुरू केला. व्हिडिओवर ‘न्यूज तक’ लोगो होता. त्यानंतर आम्ही कीवर्ड शोधण्यास सुरुवात केली, परंतु आम्हाला समान व्हिडिओ सापडला नाही. मग तो मध्य प्रदेशातील व्हिडिओ असल्याने आम्ही हिंदीमध्ये कीवर्ड शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही हिंदी मध्ये युट्युबवर किवर्ड सर्च केला, ‘शिवराज सिंह चौहान रोने लगे News Tak’. यावरून आम्हाला मूळ व्हिडिओ सापडला.
हा 1 मिनिट 30 सेकंदांचा व्हिडिओ होता. दत्तक कन्या भारती यांचे निधन झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांना अश्रू अनावर झाले, असे या बातमीत नमूद करण्यात आले आहे. हा व्हिडिओ चार वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता. मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात ही घटना घडल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, भारती ही शिवराज सिंह चौहान यांच्या सेवाश्रमाची माजी रहिवासी होती. मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी भारतीला आपल्या मुलीसारखे वागवले आणि गेल्या वर्षी तिचा विवाह सोहळा संपन्न झाला होता.
निष्कर्ष : शिवराज सिंह चौहान रडताना दिसत असलेला व्हायरल व्हिडिओ जुलै 2019 चा आहे जेव्हा शिवराज सिंह यांची दत्तक मुलगी भारती वर्मा हिचे मध्य प्रदेशात निधन झाले होते. हा व्हिडिओ अलीकडील असल्याचा सांगून व्हायरल होत आहे.

Old Video Of Shivraj Singh Chouhan Crying Falsely Viral As Recent

Video Of Shivraj Singh Chouhan Tearing up Over Losing Out On CM Post?

Video of Shivraj Singh Chouhan Crying Linked to 2019 Personal Tragedy

2019 Video of Shivraj Singh Chouhan Crying Resurfaces

शिवराज चौहान यांचा रडताना Video व्हायरल;
मुख्यमंत्री पद गमावल्याने दुःख झाल्याची चर्चा, मुळात घडलं काय?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm