बेळगाव : मच्छे डबल मर्डर प्रकरण; ठोस धागेदोरे मिळाल्याची शक्यता; तीन पथकांची तपासणी

बेळगाव : मच्छे डबल मर्डर प्रकरण;
ठोस धागेदोरे मिळाल्याची शक्यता;
तीन पथकांची तपासणी

belgavkar.com | belgaum | belgavkar

कॉल डिटेल्सवरून पोलिस खात्याचा तपास

बेळगाव : मच्छेतील दुहेरी हत्याकांड प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना केली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे. मच्छे येथे दोन विवाहितांच्या खुनाचा उलगडा येत्या 48 तासातं होण्याची शक्यता आहे. तसे संकेत वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले आहेत. दोन्ही महिलांच्या कॉल डिटेल्सवरून पोलिस खाते मारेकर्‍यापर्यंत पोहोचले आहे. परंतु, याबाबत गुप्तता पाळली असून अधिकार्‍यांकडून उद्या एकूण प्रकरण जाहीर केले जाणार आहे. मच्छेतील रोहिणी गंगाप्पा हुलीमनी (वय 21) आणि तिची मैत्रीण राजश्री रवी बन्नूर (वय 21) (दोघीही मूळ रा. काळेनट्टी, सध्या रा. मच्छे) यांची वॉकिंगला जाताना हत्या झाली होती. पाच महिन्यांच्या गर्भवतीसह तिच्या विवाहित मैत्रिणीची निघृण हत्या शनिवारी (26 सप्टेंबर) मच्छे येथे झाली होती. दुहेरी हत्याकांडामुळे बेळगाव हादरले. याची गांभीर्याने दखल घेऊन पोलिस आयुक्तांनी तपासासाठी तीन पथकांची स्थापना केली. या पथकांना तपासात यश आल्याची माहिती मिळाली आहे.

दोघा खुन्यांनी या दोघींवर चाकूने सपासप वार करत खून केला. दोघीही जागीच ठार झाल्यानंतर शहर व तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हा खून नेमका कशासाठी व कोणी केला? याबाबत आधी दोन दिवस पोलिसांना काहीच सुगावा लागला नाही. परंतु, मंगळवारी पोलिसांनी याचा गांभीर्याने तपास केला. खुनानंतर लगेचच कॉल डिटेल्स मागविले होते. त्यावरून एका निकषापर्यंत पोलिस खाते पोहोचले असून, लवकरच मारेकर्‍यांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु, हा खून कोणी करवून आणला आहे, याचा सखोल तपशील पोलिसांकडून घेणे सुरू असल्याने अद्याप याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. परंतु, अद्याप आणखी काही गोष्टी स्पष्ट व्हायच्या असून, दोन दिवसांत या प्रकरणातील गुन्हेगार समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी चौकशीदरम्यान नातेवाईक आणि घरच्यांशी बातचीत केली. काहींना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी संशयित आणि मारेकऱ्यांचा तपशील दिला. काही पोलिसांच्या ताब्यात असून काही फरारी आहेत. त्यांचा तपास सुरु असुन दोन दिवसांत संशयितांना अटक करण्याची शक्यता आहे.
मच्छेतील दुहेरी हत्याकांडाच्या चौकशीसाठी तीन पथके स्थापली आहेत. या पथकांकडून उपलब्ध माहितीनुसार प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. -डॉ. विक्रम आमटे, पोलिस उपायुक्त
खून केल्यानंतर आरोपींनी पलायन केले होते. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले होते. मात्र 24 तासांतच या खूनाचे धागेदोरे सापडले होते. त्यानंतर आता या प्रकरणाला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी गती दिली असून येत्या दोन दिवसांमध्ये तपासपूर्ण होणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर त्यांच्या सहकार्यांनी तपास सुरु केला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : मच्छे डबल मर्डर प्रकरण; ठोस धागेदोरे मिळाल्याची शक्यता; तीन पथकांची तपासणी
कॉल डिटेल्सवरून पोलिस खात्याचा तपास

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm