बेळगाव : निडसोशीवाडी येथे दुचाकीने धडक दिल्याने 8 वर्षीय बालक जागीच ठार

बेळगाव : निडसोशीवाडी येथे दुचाकीने धडक दिल्याने 8 वर्षीय बालक जागीच ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : निडसोशीवाडी बसस्थानकानजीक रस्त्याशेजारी थांबलेल्या बालकाला दुचाकीने धडक दिल्याने बालक जागीच ठार झाल्याची घटना घडली. सुदीप बसवराज दोनवडे (वय 8, रा. निडसोशी, ता. हुक्केरी) असे अपघातात ठार झालेल्या बालकाचे नाव आहे. संकेश्वरहून अकिवाटला निघालेल्या बजार पल्सर (KA 23 E 2348) दुचाकीने धडक दिल्याने सुदीपचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे. यासंदर्भात मयत सुदीपची आई सुरेखा हिने संकेश्वर पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक जे. बी. कोगेनहळ्ळी व सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : निडसोशीवाडी येथे दुचाकीने धडक दिल्याने 8 वर्षीय बालक जागीच ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm