बेळगाव जिल्ह्यात शेतकर्यासह तिघांची आत्महत्या

बेळगाव जिल्ह्यात शेतकर्यासह तिघांची आत्महत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव :
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या
केल्याची घटना सोमवारी (28 सप्टेंबर) दुपारी चारच्या सुमारास अल्लूर के. एम. (ता. हुक्केरी) येथे घडली. विरुपाक्षी सिद्दाप्पा मगदूम (वय 65) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीकामासाठी काढलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करता आली नसल्याने विरुपाक्षी हे काही दिवसांपासून मानसिक अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांनी घरात विषप्राशन करून आत्महत्या केली. यासंदर्भात मयत विरुपाक्ष यांची पत्नी सुशीला हिने संकेश्वर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. सोमवारी घरात कोणी नसल्याचे पाहून विषप्राशन केले होते. त्यामुळे अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी संकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. विरुपाक्षने सहकारी संस्था व इतर बँकांतून एक लाख सात हजारांचे कर्ज घेतले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. पोलिस उपनिरीक्षक जे. बी. कोगेनहळ्ळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
नाईंग्लज येथे युवकाची आत्महत्या@ नाईंग्लज (ता. चिकोडी) येथील युवकाने दारूसाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. अजित राजू नाईक (वय 27) असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पत्नी पूजा यांनी खडकलाट पोलिसांत फिर्याद दिली आहे. अजित हा शेतमजूर होता. त्याला दारूचे व्यसन होते. याने कुटुंबीयांकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र, त्याला नकार मिळाल्याने अजित याने सकाळी 7 ते 10 या वेळेत घरात कोण नसल्याचे पाहून गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच उपनिरीक्षक सुरेश मंटूर, हवालदार विनोद कंग्राळकर, के.के. सनदी, एम.व्ही. पुजारी यांनी घटनास्थळी पाहणी केली. दुपारी निपाणीतील सरकारी महात्मा गांधी रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, 4 वर्षाची मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
वडगावला तरुणाचा मृत्यू
बेळगाव शहरातील वडगाव येथे तरुणाने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. जयपाल कल्लाप्पा नाईक (वय 38, रा. नाझर कॅम्प वडगाव) असे मृताचे नाव आहे. याबाबत शहापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जयपाल हा पेंटिंग काम करीत होता. कोरोना काळात काम नसल्याने तो घरीच होता. परंतु, त्याला दारूचे व्यसन लागले होते. यातून घरात सातत्याने भांडण काढत होता. सतत नशेत राहिल्याने तो गेल्या चार - पाच दिवसांपासून घरी देखील गेला नव्हता. मंगळवारी मध्यरात्री नाझर कॅम्प परिसरातील एका विहिरीत तो पडल्याची माहिती घरच्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. शहापूर पोलिसांत नोंद झाली असून निरीक्षक राघवेंद्र हावलदार तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव जिल्ह्यात शेतकर्यासह तिघांची आत्महत्या

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm