बेळगाव : उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी बिदर येथे पाठविण्याचा आदेश अखेर रद्द

बेळगाव : उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी बिदर येथे पाठविण्याचा आदेश अखेर रद्द

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : दहावी पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी बेळगावच्या शिक्षकांना बिदर येथे पाठविण्याचा आदेश अखेर रद्द केला आहे. यासंदर्भात कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांना निवेदन देण्यात आले होते. यासंदर्भात तातडीने निर्णय झाला नाही, तर पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. अखेर त्याची दखल घेतली आहे. दहावी पुरवणी परीक्षेच्या पेपरचे मूल्यमापन करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील शिक्षकांना बिदर जिल्ह्यात मूल्यमापनासाठी जाण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र त्या विरोधात कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षण संघटनेने आवाज उठविताच तो आदेश रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक संघटनेच्या आंदोलनाला यश आले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील शिक्षकांना बिदर येथे मूल्यमापनासाठी परीक्षा बोर्डाकडून जाण्याचे आदेश देण्यात आले होते. कोरोनाकाळात शिक्षकांना त्या ठिकाणी जाऊन मूल्यांकन करणे अवघड जाणार होते. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांनी त्याला तीव्र विरोध केला. याबाबत निवेदनही देण्यात आले होते. शिक्षणमंत्री सुरेश कुमार, आमदार महांतेश कवटगीमठ, आमदार अरुण शहापूर, आमदार अनिल बेनके यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला होता. त्याची दखल घेऊन हा आदेश रद्द करण्यात आला आहे.
संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप बुदीहाळ, राज्य सचिव चिदानंद पाटील, जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मराठी माध्यमाच्या गणित विषयाच्या मूल्यमापनासाठी हा आदेश आला होता. मात्र, तो रद्द झाल्याने शिक्षकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी बिदर येथे पाठविण्याचा आदेश अखेर रद्द

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm