बेळगाव : आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास भावी पिढीसमोर उभा असावा व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, तसेच गावच्या ऐतिहासिक वैभवात भर पडावी या उद्देशाने बेळगाव तालुक्यातील किणये ग्रामस्थ व पंच क्रोशीतील ग्रामस्थ आणि देणगीदारांच्या सहकार्यातून किणये गावच्या प्रवेशद्वारावर हिंदवी स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांची 10 फुटी अश्वारूढ मूर्ती बसवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ही शिवाजी महाराजांची मूर्ती ब्राँझ या धातुची असणार आहे. गावात येणाऱ्या प्रत्येकाच्या दृष्टीने ही मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.