झाला स्वतंत्र कल्याण कर्नाटकाचा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न

झाला स्वतंत्र कल्याण कर्नाटकाचा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक : राज्यात शासकीय राज्योत्सव सुरू असतानाच काही भागात विशेषतः उत्तर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटकात (हैदराबाद कर्नाटक रिजन - Hyderabad Karnataka region) राज्योत्सवावर बहिष्कार घालून जनतेने सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. उत्तर कर्नाटकाच्या विकासाकडे सर्वच पक्षांच्या सरकारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत सरकारच्या धोरणाचा निषेध केला. गुलबर्गा येथे तर स्वतंत्र कल्याण कर्नाटकाचा ध्वज (6 जिल्ह्यांचा समावेश) फडकविण्याचा प्रयत्न झाला. यावरून येथील कर्नाटकातील जनता राज्यात खूश नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
राज्यात कोणतेही सरकार अस्तित्त्वात आले तरी कल्याण कर्नाटकाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा दावा करून स्वतंत्र राज्याचा ध्वज उभारण्याचा प्रयत्न करणाऱ्या निदर्शकांना पोलिसांनी गुलबर्यात ताब्यात घेतले. गुलबर्गा शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सर्कलमध्ये राज्योत्सव कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यात आला, स्वतंत्र कल्याण कर्नाटकाची मागणी करून स्वतंत्र राज्य संघर्ष समितीने (Kalyana Karnataka Pratyeka Rajya Horata Samiti) स्वतंत्र कल्याण कर्नाटक राज्याचा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी दहापेक्षा अधिक लोकांना अटक केली. कल्याण कर्नाटकाला राज्य सरकार सातत्याने सापत्नभावाची वागणूक देत आहे.
राज्य सरकारकडून या भागाच्या विकासाचा पाठपुरावा केला जात आहे. मंत्रीपदावरूनसुध्दा या भागाची फसवणूक झाली आहे. घटनेच्या कलम 371 मध्ये केलेल्या दुरुस्तीचा काहीही उपयोग झालेला नाही. हा अन्याय असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारविरुध्द घोषणा दिल्या. त्याचबरोबर स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी बसवकल्याण विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लढवणार असल्याचेही एम. एस. पाटील यांनी सांगितले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

झाला स्वतंत्र कल्याण कर्नाटकाचा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm