बेळगाव शहरात पुन्हा पुन्हा भूमिगत गॅस पाइपलाईन गळती; 'या' ठिकाणी झाली गळती

बेळगाव शहरात पुन्हा पुन्हा भूमिगत गॅस पाइपलाईन गळती;
'या' ठिकाणी झाली गळती

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहर आणि परिसरात गॅस लाईन घालण्याचे काम जोरात सुरू आहे. दरम्यान सदर कामात अनेक ठिकाणी आत्तापर्यंत घालण्यात आलेल्या मेघा गॅस कंपनीच्या भूमिगत गॅस पाइपलाईनला गळती लागल्याचे प्रकार वेळोवेळी उघडकीस आले आहेत. असाच प्रकार आज शुक्रवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास वैभवनगर बॉक्साईड रोड, बसव काॅलनी मार्गावर घडला आहे. या मार्गावर घालण्यात आलेल्या गॅस लाईनला गळती लागली. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळी अग्नीशामक दलाचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी धावून मोठ्या प्रमाणावर स्वयंपाकाचा गॅस गळती होण्यापासून रोखले. गॅस गळती रोखण्याचे काम सुरू असताना मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक रोखण्यात आली होती. त्यामुळे मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. गॅस गळतीमुळे काही वेळासाठी घबराट पसरली होती. मात्र थोड्या वेळानंतर येथील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी येऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. तसेच तातडीने दुरुस्ती काम हाती घेतले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरात पुन्हा पुन्हा भूमिगत गॅस पाइपलाईन गळती; 'या' ठिकाणी झाली गळती

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm