कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरण

कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरण

belgavkar.com | belgaum | belgavkar

आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक विकासासाठी मराठा विकास प्राधिकरण

कर्नाटक सरकारने मराठा समाज विकास प्राधिकरणाची घोषणा केली आहे. त्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरापा यांच्या सूचनेनुसार शनिवारी राज्याच्या मागास समाज विकास खात्याचे अतिरिक्‍त मुख्य सचिव गंगाराम बडेरिया यांनी आदेश बजावला आहे. राज्यात मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक विकासासाठी मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. एकीकडे बेळगावात मराठी भाषिकांनी डिवचले जात असताना आणि ज्या कर्नाटक सरकारने बेळगाव चे नामकरण केले त्याच राज्य सरकारने राजकारणासाठी या प्राधिकरणासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यात मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. बेळगाव, बिदरसह उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटकातही मराठा समाज असून भाजपला नेहमीच मराठा समाजाचा पाठिंबा मिळत आला आहे. त्यामुळे नेहमीच मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मराठा समाजाच्या विकासावर भर दिला आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे मोर्चे निघाले. आरक्षणासाठी कर्नाटकातही मराठा समाजाने ठिकठिकाणी मोर्चे काढले. मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींनी हा विषय विधानसभेतही लावून धरला होता. राज्य सरकारने आता आरक्षण दिले नसले तरी मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करून मराठा समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
पोटनिवडणुकीवर नजर?
बेळगाव लोकसभा मतदार संघ तसेच बिदर जिल्ह्यातील कल्याण विधानसभा मतदार संघात काही दिवसांत पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. या दोन्ही मतदार संघात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मराठा समाजाची मते आपल्याकडे वळवण्यासाठी राज्य सरकारने ही घोषणा तातडीने केल्याचे निरीक्षण व्यक्‍त केले जात आहे.
मराठा समाजाला खूश करण्यासाठी यापूर्वीही राज्यात शासकीय पातळीवर शिवजयंती साजरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी घेतला होता. त्यानुसार त्यांनी राज्यात ती सुरुही केली. राज्याच्या अर्थसंकल्पात यापूर्वी त्यांनी ५ कोटी रुपये अनुदानही जाहीर केले होते ; मात्र त्याचा फायदा दक्षिण कर्नाटकपुरता मर्यादित राहिला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी मराठा समाजाच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेत समाजाला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरण
आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक विकासासाठी मराठा विकास प्राधिकरण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm