बेळगाव : श्री सिद्धेश्वर गो-शाळेचा शुभारंभ

बेळगाव : श्री सिद्धेश्वर गो-शाळेचा शुभारंभ

belgavkar.com | belgaum | belgavkar

गोमातांना आसरा देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा पुढाकार

बेळगाव : शेतकर्यांचे जीवनमान उंचावणार्या परंतु काही काळानंतर सोडून दिल्या जाणार्या गोमातांना आसरा देण्यासाठी व त्यांचे रक्षण करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने पुढाकार घेतला
आहे. कलखांबजवळील मराठा कॉलनीच्या मागे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांच्यावतीने वसुबारसच्या मुहूर्तावर श्री सिद्धेश्वर गोशाळेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवप्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
गायींमधील काम करण्याची क्षमता संपल्यावर तसेच गायींना व्याधी झाल्यास त्यांना मोकळ्यावर सोडून देण्यात येते. त्यामुळे असे न करता त्या गायी शिवप्रतिष्ठानकडे सुपूर्द कराव्यात, अशी विनंती शिवप्रतिष्ठानचे विभाग प्रमुख हिरामणी मुचंडीकर यांनी केली आहे. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित
होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : श्री सिद्धेश्वर गो-शाळेचा शुभारंभ
गोमातांना आसरा देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा पुढाकार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm