बेळगावप्रश्नी अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याचा केला निषेध; कर्नाटक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री

बेळगावप्रश्नी अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याचा केला निषेध;
कर्नाटक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री

belgavkar.com | belgaum | belgavkar

जाळला चन्नम्मा चौकात पवारांचा प्रतिकात्मक पुतळा

बेळगाव : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त महाराष्ट्र संदर्भात केलेल्या व्यक्तव्याचा निषेध करतो, असे कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी म्हटले आहे. कर्नाटक नेत्यांसह कन्नड संघटनांनी वक्तव्याचा विरोध केला असुन बेळगाव शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौक येथे करवे कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला आहे. महाराष्ट्र सरकार व उपमुख्यमंत्री अजित पवार सीमाप्रश्‍न विनाकारण उकरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत, असे येडियुराप्पा यांनी म्हटले आहे. तसेच महाजन अहवालच अंतिम आहे, हे पूर्ण जगाला माहिती आहे, असेही येडियुराप्पा यांनी सांगितले.

कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सांगितले की, सूर्य-चंद्र अस्तित्त्वात आहे तोपर्यंत बेळगाव कर्नाटकाचे, आणि बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अजित पवार यांचे विधान निंदनीय आहे. ते म्हणाले की, अनावश्यक गोंधळ निर्माण व्हावा म्हणून राज्याच्या कोणत्याही भागावर अशी विधाने करण्याची गरज नाही.
काय म्हणाले होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार
स्वर्गीय बाळासाहेबांचं 'ते' स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया; बेळगाव, कारवार, निपाणी...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिवसानिमित्त त्यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिलीये. यावेळी अजित पवार म्हणाले, 'महाराष्ट्राच्या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर नेहमी अधिराज्य केलं. महाराष्ट्राची अस्मिता तसंच मराठी माणसाचा सन्मान आणि सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला.'
राज्याची सर्वांगिण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया, असंही अजित पवार म्हाणालेत.
स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावप्रश्नी अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याचा केला निषेध; कर्नाटक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
जाळला चन्नम्मा चौकात पवारांचा प्रतिकात्मक पुतळा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm