बेळगाव शहरात 100 एकर जागेत मेगा डेअरी...

बेळगाव शहरात 100 एकर जागेत मेगा डेअरी...

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव शहरात 100 एकर जागेत मेगा डेअरी उभारण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे या भागातील शेकडो बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. मेगा डेअरी उभारण्याच्या कामाला काही दिवसांत सुरवात करणार असल्याची माहिती सहकारमंत्री मंत्री एस. टी. सोमशेखर यांनी दिली. कर्नाटक सहकार दूध उत्पादक महामंडळातर्फे आंजनेयनगरातील केएमएफ आवारात 67 अखिल भारतीय सहकार सप्ताहाचे उदघाटन बुधवारी (18 नोव्हेंबर) झाले. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, चालू वर्षात राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत (डीसीसी) शेतकऱ्यांना 15,300 कोटींचे कर्ज देण्याची सरकारची योजना आहे. आत्मनिर्भर योजनेंतर्गत 630 कोटींचे कर्ज देण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. केएमएफला 130 कोटींचा नफा झाला आहे. लॉकडाउननंतर व्यवसाय पूर्वपदावर येत आहे. सहकार तत्वावर कार्य करीत असलेले केएमएफ (The Karnataka Milk Federation KMF) अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी सहकार संस्थांना लाभ मिळवून देण्याच्या दिशेने कार्य चालविले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरात 100 एकर जागेत मेगा डेअरी...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm