बेळगाव : टिळकवाडी येथे जखमी वानरावर पशूप्रेमींकडून उपचार

बेळगाव : टिळकवाडी येथे जखमी वानरावर पशूप्रेमींकडून उपचार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : टिळकवाडी येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या वानरावर उपचार करून बार्क (BARC - Belgaum Animal Rescue And Care) संघटनेने त्याला वनविभागाकडे सुपूर्द केले. वानर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती काही मुलांनी फुटबॉल प्रशिक्षक राहल देशपांडे यांना दिली. देशपांडे यांनी बेळगाव ॲनिमल रेस्क्यू अँड केअर या सेवाभावी संस्थेला ही माहिती दिली. काही वेळातच संस्थेचे सागर चतरकी व समर्थ चतरकी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनाही बोलावून घेण्यात आले. यानंतर चतरकी यांनी रानडे रोड, टिळकवाडी येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या वानराला पशुवैद्यकीय दवाखान्यात हलवले. उपचारांनंतर वानराला वनखात्याकडे सुपूर्द केले. यावेळी शिवानंद मगदूम, विनय गौडर, मंजुनाथ शिगेहळ्ळी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : टिळकवाडी येथे जखमी वानरावर पशूप्रेमींकडून उपचार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm