belgaum-vadagav-youth-satpute-drowned-malaprabha-river-nala-202011.jpg | बेळगाव : खानापूरात वडगावचा युवक बुडाला | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : खानापूरात वडगावचा युवक बुडाला

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीच्या हालात्री नाल्याच्या संगम जवळ वडगाव (बेळगाव शहर) येथील एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (22 नोव्हेंबर) दुपारी 1 च्या सुमारास घडली आहे. हालाञी नाल्याच्या संगम जवळ असलेल्या टुरिस्ट स्पॉट जवळ सुट्टीच्या दिवशी आपल्या मित्रांसमवेत आलेल्या मंजुनाथ मल्लकार्जुन सातपुते (वय 28, रा. रणझुंजार कॉलनी, वडगाव) याचा बुडून मृत्यू झाला आहे. सदर युवक वडगाव केएलई येथे एक्सरे लॅब टेक्नीशियन होता. त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.
रविवारी सुट्टीच्या दिवशी मंजुनाथ सातपुते व विविध ठिकाणी टेक्नािशियन व वैद्यकीय सेवा बजावणारे अन्य 6 मित्र आनंद लुटण्यासाठी खानापूर शेडेगाळी जवळील मलप्रभा नदीच्या हालात्री नाला संगम टुरिस्ट स्पॉट वर आले होते. दुपारी सर्व मित्र नदीपात्रात उतरले. मंजुनाथही नदीच्या पत्रात आंघोळ करत होता. यावेळी तो पुढे गेला असता त्याला नदीपात्राचा अंदाज आला नाही. तो गटांगळ्या खाऊन बुडाला. बुडत असल्याचे लक्षात येतात सोबत असलेल्या मित्रांनी वाचवण्यासाठी प्रयत्न केले.
पण तो हाती लागला नाही. ही घटना लक्षात आल्यानंतर त्याच्या मित्रांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. माञ तो बुडाला होता. यानंतर अग्निशामक दल व पोलिसांनी पाण्यातून युवकाचा मृतदेह बाहेर काढला. खानापूर पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.