belgaum-sankeshwar-vallabhgad-merchant-navy-officer-amit-gaikwad-death-boat-ship-accident-202011.jpg | बेळगाव : वल्लभगडच्या मर्चट नेव्ही अधिकार्यांचा जहाजामध्ये अपघाती मृत्यू | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : वल्लभगडच्या मर्चट नेव्ही अधिकार्यांचा जहाजामध्ये अपघाती मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव - संकेश्वर : वल्लभगड (हरगापूरगड, ता. हुक्केरी) येथील अमित गणपती गायकवाड (वय 29) यांचा जहाजामध्ये 13 ऑक्टोबर 2020 रोजी अपघाती मृत्यू झाला होता. ते मर्चट नेव्हीमध्ये सेवेत होते. अमित यांचा मृतदेह रविवारी (22 नोव्हेंबर) वल्लभगड येथे दाखल झाल्यावर शोकाकुल वातावरणात 41 दिवसांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, अमित गायकवाड मुंबईतील हेरल्ड मरीन टाईम सर्व्हिसेस (मर्चंट नेव्ही) कंपनीमध्ये सेवेत होता. सेवेवर असताना अमेरिकेमध्ये 13 ऑक्टोबरला त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
जहाज समुद्रात असल्याने आजपर्यंत मृतदेह जहाजामध्येच सुरक्षित ठेवण्यात आला होता. महिन्यापूर्वीच तो गावी सुट्टीवर आला होता. त्याचा मृतदेह शनिवारी अमेरिकेतून बोटीमधून मुंबई येथे आणण्यात आला. रविवारी सकाळी मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गे अमितचा मृतदेह जन्मगावी वल्लभगड (हरगापूरगड) येथे आणण्यात आला. तेथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून अंत्ययात्रा काढून शेतात अंत्यविधी करण्यात आले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण वल्लभगड येथे झाले तर पदवीचे शिक्षण गडहिंग्लज येथे झाले होते. तीन वर्षापूर्वी तो मुंबई येथे मर्चट नेव्हीमध्ये भरती झाला होता. अमित यांच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. वडील गणपती गायकवाड हे वल्लभगड येथील कृषी पत्तीन संघाचे उपाध्यक्ष आहेत. अमित अविवाहित होते. पाच वर्षांपूर्वी ते मर्चट नेव्हीत दाखल होऊन ऑफिस सुपरिटेंडेंट पदावर सेवेत होते. आज मृतदेह दाखल झाल्यावर कुटुंबीयांसह नातेवाईकांना शोक अनावर झाला होता. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण गाव हळहळत होते.