Facebook-Friend-Circle-Help-Patient-Family-Poor-Family-202011.jpg | बेळगाव : फेसबुक फ्रेंड्स सर्कलमुळे मिळाली मदत | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : फेसबुक फ्रेंड्स सर्कलमुळे मिळाली मदत

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : गरीब परिस्थितीमुळे हॉस्पिटलचे बिल देण्यास असमर्थ ठरलेल्या एका रुग्ण महिलेचे 12 हजार रुपये फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या समूहाने अवघ्या दोन तासांत भरले. सदर रुग्ण महिलेला फुप्फुसाचा त्रास होत असून तिचे पती एका स्टुडीओमध्ये कामाला आहेत. या महिलेची मुलगी नुकतीच पदवीधर झाली असून पैशाअभावी तिचे शिक्षण खोळंबले आहे. दुर्दैव म्हणजे या महिलेच्या मुलाच्या कानाला सूज आली असून त्याचीही शस्त्रक्रिया करावयाची आहे.
Facebook Friend Circle चे संतोष दरेकर यांना ही माहिती मिळताच त्यांनी तसेच कॅन्टोन्मेंट मराठी शाळेचे प्राचार्य प्रशांत बिर्जे, माजी महापौर विजय मोरे, सिद्धभैरव सोसायटीचे चेअरमन रणजीत पाटील, राजू काकती, मनोज मत्तीकोप्प यांनी संतोष दरेकर यांच्याकडे आपली मदत सुपूर्द केली. संतोष यांचे मित्र विकास प्रभू यांनी रुग्ण महिलेचा पती व मुले चिंताक्रांत असल्याचे पाहून त्यांची चौकशी केली व त्याने संतोष दरेकर यांना याबाबत माहिती दिली. फेसबुक प्रेंड्सच्या सर्व सदस्यांनी मदत जमा करून हॉस्पिटलचे बिल भरले. त्यामुळे या कुटुंबाला दिलासा मिळाला.