Belgaum-Bapat-Galli-Kalikadevi-Yuvak-Mandal-Help-Swimming-Help-Coronavirus-202011.jpg | बेळगाव : बापट गल्ली 'कालिकादेवी' मंडळाची जलतरणपटूंना मदत | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : बापट गल्ली 'कालिकादेवी' मंडळाची जलतरणपटूंना मदत

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बापट गल्ली येथील 'कालिकादेवी' युवक मंडळाची जलतरणपटूंना आर्थिक मदत
कोरोनाचा फटका अनेक क्षेञातील लोकांना बसला आहे. खेळाडू व प्रशिक्षकही त्यातून सुटलेले नाहीत. येथील राष्ट्रीय खेळाडू भरत पाटील, मास्टर राष्ट्रीय जलतरणपटू कल्लाप्पा पाटील व महिला राष्ट्रीय मास्टर्स जलतरणपटू राजश्री पाटील यांच्या रोजगारावरही संक्रात आली. त्यांची रोजंदारी फक्त जलतरण तलावांतील प्रशिक्षणावर होती. पण, 22 मार्चपासून त्यांचा उदरनिर्वाहच ठप्प झाला होता.
शेवटी त्यांनी जलतरण तलावासमोर काजू व भाजी विकण्याचा व्यवसाय सुरु केला. तरीही हे कुटुंब आर्थिक विवंचनेत होते. ही अडचण लक्षात घेऊन बापट गल्लीतील कालिकादेवी युवक मंडळ त्यांच्या मदतीला धावून गेले. मंडळाने या कुटुंबाला आर्थिक मदत दिली. याप्रसंगी मंडळाचे सदस्य, पदाधिकारी व गल्लीतील रहिवासी उपस्थित होते.