belgaum-city-ganja-sell-two-arrested-belgaum-202011.jpg | बेळगाव शहरामध्ये गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव शहरामध्ये गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहरामध्ये धर्मवीर संभाजी चौक व अयोध्यानगर येथे गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना सापळा रचून अटक करण्यात आली आहे. शहर सीआयडी विभागातर्फे सदर कारवाई करण्यात आली आहे. धर्मवीर संभाजी चौक येथे केलेल्या कारवाईत सैफअली मडीवाळे (वय 27, रा. अगसार गल्ली, पिरनवाडी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 10,400 रु. किंमतीचा 520 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
belgaum-city-ganja-sell-two-arrested-belgaum-20201128.jpg | बेळगाव शहरामध्ये गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर
27 नोव्हेंबर रोजी मार्केट पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत येणाऱ्या अयोध्यानगर येथे सीआयडी विभागाच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत अकिब जावीद मनीयार (वय 27) याला अटक करण्यात आली आहे. गांजा विकत असताना रंगेहाथ त्याला पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून 12,200 रु किंमतीचा 610 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. सीआयडीचे डिटेक्टिव्ह इन्सपेक्टर लक्ष्मण हुंडरद व त्यांचे सहकारी जगदीश बागनावर, जे. आर. शिरसंगी, चिदंबर चट्टरकी यांनी सदर कारवाई केली.