YuvaSamitiBelgav.jpg | बेळगाव : युवा समिती करणार गरजू विद्यार्थ्यांना मदत | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : युवा समिती करणार गरजू विद्यार्थ्यांना मदत

belgavkar.com | belgaum | belgavkar

सहकार्य समाजाचे | कर्तव्य युवा समितीचे : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्याकरिता सीमाभागातील शाळांमधून पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या मागवली आहे. शाळेतील शिक्षक, शाळा सुधारणा समिती, माजी विद्यार्थी आणि युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी येत्या 15 डिसेंबरपर्यंत युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावी.
कोरोना महामारीमुळे बरेच पालक आर्थिक अडचणीत आहेत; या गरजू विद्यार्थ्यांनाही युवा समितीतर्फे शैक्षणिक साहित्य देण्यात येईल. गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांची नावे सुद्धा शाळांकडून मागविण्यात आली आहेत. पटसंख्या आणि गरजू विद्यार्थ्यांची नावे देण्यासाठी युवा समितीचे स्थानिक पदाधिकारी तसेच श्रीकांत कदम, अश्वजित चौधरी, सिद्धार्थ चौगुले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पटसंख्या आणि गरजू विद्यार्थ्यांची नावे देण्यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
श्रीकांत कदम : 9611756529
अश्वजित चौधरी : 7353786804
सिद्धार्थ चौगुले : 7338097882