durgaveer-pratishthan-belgaum-fort-vallabhgad-and-kalanidhigad-fort-202011.jpg | बेळगाव : गडकोट जपण्यासाठी सुरू असलेली दुर्गवीरांची चळवळ... | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : गडकोट जपण्यासाठी सुरू असलेली दुर्गवीरांची चळवळ...

belgavkar.com | belgaum | belgavkar

किल्ले वल्लभगड (संकेश्वर - बेळगाव); किल्ले कलानिधीगड (चंदगड - कोल्हापूर)

बेळगाव : आजही फक्त महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत असेलेले बेळगाव अन त्या बेळगाव जिल्ह्यातील (सीमाभाग) दुर्गवीर श्रमदानातून संवर्धनासाठी झटत आहेत वल्लभगड व कलानिधी या गडासाठी. काल रविवारी (29 नोव्हेंबर) दोन्ही गडांवर झालेल्या श्रमदान मोहिमापाहून नक्कीच असं वाटतंय की आता हळूहळू दुर्गवीरांचं बळ वाढत चाललंय. या गडकोटांवर गेली कित्येक वर्षे दुर्गसंवर्धन करणारे हात आता मजबूत व्हायला लागलेत. जरी दोन राज्यात आम्हां मावळ्यांच विभाजन झालं असेल तरी या गडकोटांनवर काम करताना अस कधी वाटलंच नाही. असे बेळगाव व चंदगड मधील गडप्रेमी सतत या कार्यातून व्यक्त होत असतात.
गेल्या 7 वर्षांपासून या गडांवर असच नियमितपणे संवर्धन कार्य सुरू आहे. आता अपेक्षा आहे कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांकडून योग्य सहकार्याची. आपणही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून या गडकोटांच्या संवर्धन कार्यासाठी पुढे या.... सडा किल्ला, वल्लभगड, कलानिधीगड, सामानगड या गडकोटांवर अजून जोमाने अन योग्य असे भरीव असे काम करायचंय..
दुर्गवीर प्रतिष्ठान www.durgveer.com
बेळगाव, चंदगड, संकेश्वर, गडहिंग्लज, कोल्हापूर