belgaum-accb-arrest-village-accountant-in-bribe-case-talathi-202012.jpg | बेळगाव : लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला  एसीबीने केले अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला एसीबीने केले अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी, तसेच त्यांचा बी ग्रुपमध्ये समावेश करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मुसगुप्पी (ता. मुडलगी) येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी (एसीबी Anti Corruption Bureau) अटक केली. सोमवारी (30 नोव्हेंबर) ही कारवाई करण्यात आली असून अशोक तळवार असे या तलाठ्याचे नाव आहे.
मुसगुप्पी गावचे तलाठी म्हणून कार्यरत असलेले तळवार हे मुडलगी येथील तहसीलदार कार्यालयात कार्यरत होते. अतिवृष्टीमुळे घराची पडझड झालेल्या कुटुंबियाला नुकसान भरपाई मिळवून मिळावी, तसेच त्यांचा बी ग्रुपमध्ये समावेश करण्यासाठी तळवार याने अरभावी येथील आनंद धर्मट्टी यांच्याकडून 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे अशोक तळवार धर्मट्टी यांनी याप्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सोमवारी नुकसानग्रस्ताकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी अधिकाऱ्यांनी तलाठ्याला रंगेहात अटक केली.
एसीबीचे पोलिसप्रमुख बी. एस. न्यामगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस उपअधीक्षक वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, सुनीलकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. संशयिताला अटक करुन त्याची चौकशी करण्यात येत आहे.