police-van-siren.jpg | बेळगाव शहरात चाकूहल्ला; खूनाचा प्रयत्न करणाऱ्या डॉनविरोधात तक्रार | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव शहरात चाकूहल्ला; खूनाचा प्रयत्न करणाऱ्या डॉनविरोधात तक्रार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहरातील शिवाजीनगर येथे एकावर चाकूहल्ला करुन खून करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना रविवारी (29 नोव्हेंबर) रात्री 10.30 वाजता घडली आहे. यामध्ये गौरव प्रदीप नेसरकीकर (वय 18, रा. मुख्य दुसरा क्रॉस, शिवाजीनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मार्केट पोलिस स्थानकात स्वप्निल उर्फ डॉन (रा. शिवाजीनगर) याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जखमी गौरव व स्वप्निल दोघेही ओळखीचे आहेत. शिवाजीनगर तिसरा क्रॉस येथे रविवारी रात्री गौरव जात असताना विनाकारण भांडण उकरून काढून स्वप्निलने चाकूने हल्ला केला. यात गौरवच्या पाठीच्या डाव्या बाजूला गंभीर जखम झाली आहे. दोनवेळा चाकूने हल्ला करुन खून करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार मार्केट पोलिसांत देण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी पुढील तपास करीत आहेत.