police-van-siren.jpg | बेळगाव : खानापूर - तलवार हल्ल्यात जावयाचा खून | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : खानापूर - तलवार हल्ल्यात जावयाचा खून

belgavkar.com | belgaum | belgavkar

हल्ल्यात जावई ठार

बेळगाव : खानापूर तालुक्यात कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाचा तलवारीने हल्ला करून खून केल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील कक्केरी गावात सोमवारी (30 नोव्हेंबर) रात्री उशिरा ही घटना घडली. बिष्टाप्पा कोनसकोप्प (वय 43) असे ठार झालेल्या जावयाचे नाव आहे. बापानेच लेकीचं कुंकू पुसल्याच्या धक्कादायक घटनेनंतर संशयित आरोपी आणि हल्लेखोर सासरा फरारी झाला आहे.
याबाबत मिळालेली माहितीनुसार, सोमवारी रात्री बिष्टाप्पा यांच्या शेतात भाताची मळणी होती. मळणी सुरु असताना सासरा आणि ज्ञजावयाचे भांडण झाले. त्यानंतर भांडणाचे रूपांतर मारामारीत झाले. दरम्यान, सासऱ्याने जावयावर तलवारीने हल्ला केला. यात बिष्टाप्पा यांच्या डोक्याला वर्मी घाव बसून ते जागीच ठार झाले.