belgaum-tilakwadi-police-station-arrested-one-person-seized-6-vehicles-robbery-202012.jpg | बेळगाव शहरात अट्टल दुचाकी चोराला अटक; 6 दुचाकी जप्त | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव शहरात अट्टल दुचाकी चोराला अटक; 6 दुचाकी जप्त

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : अट्टल दुचाकी चोरट्याला टिळकवाडी पोलिसांनी सोमवारी (30 नोव्हेंबर) अटक केली. सैफुल्ला खाजिम ताशीलदार (वय 32, रा. बारावा क्रॉस, उज्ज्वलनगर) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 1.5 लाख रुपये किमतीच्या 6 दुचाकी जप्त केल्या आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, टिळकवाडीतील स्वरुप प्लाझा कॉम्प्लेक्समधील नियाज हॉटेलसमोरुन दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद टिळकवाडी पोलिसात दाखल झाली होती.
पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेऊन तपास चालविला होता. सैफुल्ला गोवावेस परिसरात संशयास्पदरित्या फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने विविध ठिकाणाहून 6 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, उपनिरीक्षक एम. वाय. कारिमनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.