बेळगाव ता. निपाणी : संकेश्वरहून निपाणीकडे दुचाकीवरून येताना येथील शहराबाहेरील हरीनगरजवळील लक्ष्मी पेट्रोल पंपानजीक दुचाकीचा ताबा सुटल्याने दोन दुचाकी एकमेकांवर आदळल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना 30 नोव्हेंबर दुपारी घडली होती. त्यात शब्बीर बशीर पीरजादे (वय 28) आणि ईश्वर सिद्धाप्पा कल्याणी (दोघेही रा. संकेश्वर) गंभीर जखमी झाले होते. बेळगाव येथे उपचार सुरू असताना शब्बीर पीरजादे यांचा मृत्यू झाला; तर ईश्वर कल्याणी याच्यावर उपचार सुरू आहेत.
शब्बीर आणि त्यांचा मित्र ईश्वर कल्याणी हे दोघे दुचाकीवरून निपाणीकडे येत होते. राष्ट्रीय महामार्गाजवळील हरीनगर येथे दुचाकी आली असता त्याचा दुचाकीवरील ताबा सुटून दुसऱ्या दुचाकीला धडक बसली. त्यात शब्बीर गंभीर, तर कल्याणी किरकोळ जखमी झाला. दोघांनाही येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून अधिक उपचारार्थ बेळगावला पाठविले होते.
- बेळगाव शहरातील तरुणी बेपत्ता
- महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर तणाव, कोल्हापुरातील शिवसैनिकांचा मोर्चा सीमेवरील शिनोळी गावाजवळ येऊन धडकला
पोलिस उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलिस ठाण्यात झाली आहे. शब्बीर यांचे संकेश्वर येथील निर्दोषी रस्त्यावर ठिबक सिंचन साहित्याचे दुकान होते. शब्बीर पीरजादे यांच्या मागे आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.