belgaum-city-youth-committed-suicide-kitwad-gajanan-kasalkar-202012.jpg | बेळगाव शहरात किटवाडच्या युवकाची आत्महत्या | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव शहरात किटवाडच्या युवकाची आत्महत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : किटवाड (ता. चंदगड) येथील युवकाने बेळगाव शहरात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (1 डिसेंबर) सकाळी उघडकीस आली. गजानन नारायण कसलकर (वय 21, रा. किटवाड, ता. चंदगड जि. कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद शहापूर पोलिस स्थानकात झाली आहे. मिळालेल्या महितीनुसार गजानन हा येळ्ळूर रोड, वडगाव येथे वास्तव्यास होता. तो एका हाॅटेलमध्ये वेटर काम करत होता.
मात्र, सरकारी नोकरी मिळाली नाही म्हणून तो निराश होता. खोलीमध्ये गजानन कसलकर कोणी नसल्याचे पाहून त्याने खोलीतील पंख्याच्या हुकाला दोरीने गळफास घेतला. सदर घटना सोमवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 ते रात्री 11 च्या दरम्यान घडली. सरकारी नोकरी मिळाली नाही म्हणून नैराश्येतून त्याने आत्महत्या केल्याची तक्रार त्याचा भाऊ लक्ष्मण नारायण कसलकर याने शहापूर पोलिस स्थानकात दाखल केली आहे.