police-line-do-not-cross-belgavkar-belgaum.jpg | बेळगाव : बेपत्ता अल्पवयीन युवतीचा मृतदेह कणकुंबीजवळ | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : बेपत्ता अल्पवयीन युवतीचा मृतदेह कणकुंबीजवळ

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : रायबाग तालुक्यातील हारुगेरीतून अल्पवयीन युवती बेपत्ता झाली होती. चार महिन्यांपूर्वी बेपत्ता असलेल्या युवतीचा मृतदेह मंगळवारी कणकुंबीजवळ आढळला आहे. तब्बल चार महिन्यांनंतर पोलिसांनी तिचा दफन केलेला मृतदेह ताब्यात घेतला. तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुन्हा कणकुंबीजवळ घातपाताच्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, हारुगेरीतील 17 वर्षीय युवती चार महिन्यांपासून बेपत्ता होती. याबाबत हारूगेरी पोलिसात घटनेची नोंद झाली होती. सुरवातीपासून त्या युवतीचा खून झाल्याचा संशय होता. मंगळवारी रायबाग पोलिसांनी कणकुंबीजवळ जंगलातून तिचा दफन केलेला सांगाडा हस्तगत केला. प्रांताधिकारी अशोक तेली यांच्या उपस्थितीत तो सांगाडा उकरुन काढण्यात आला.
हारूगेरी पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. या घटनेने कणकुंबी परिसर पुन्हा एकदा हादरुन गेला आहे. पुन्हा कणकुंबीजवळ घातपाताच्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.