police-van-siren.jpg | बेळगाव शहरात 5 जुगाऱ्यांना अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव शहरात 5 जुगाऱ्यांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बुरुड गल्लीतील जुगारी अड्ड्यावर छापा टाकून 5 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 2,070 रुपये जप्त करण्यात आले आहेत. खडेबाजार पोलिसांनी ही कारवाई केली. बुरुड गल्लीतील एका मंदिराजवळ खुलेआम जुगार खेळला जात असल्याची माहिती खडेबाजार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहकाऱ्यांनी छापा टाकून ही कारवाई केली.
बसवराज इराप्पा वर्ती (वय 42, रा. बापट गल्ली ), गजानन उर्फ महेश यल्लाप्पा काकतीकर (40, रा. बुरुड गल्ली), विजय सिध्दाप्पा काकतीकर (38, रा. बुरुड गल्ली), सूरज उर्फ राजू सिध्दाप्पा काकतीकर (42, रा. बुरुड गल्ली), परशराम फकिरप्पा किणेकर (65, रा. बुरुड गल्ली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.