belgaum-one-dies-and-two-injured-in-bike-accident-at-athani-202012.jpg | बेळगाव : अथणीत भीषण अपघातात एक ठार, दोन गंभीर | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : अथणीत भीषण अपघातात एक ठार, दोन गंभीर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : अथणी येथील अनंतपूर रस्त्यालगत बसवेश्वर चौकात दुचाकीला टिप्परने धडक दिल्याने झालेल्या अपघातातत एक जण जागीच ठार झाला तर दोघे जखमी झाले. मंगळवारी (1 डिसेंबर) सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सागर परशराम मादर (वय 20, रा. कृष्णा कित्तूर, ता. कागवाड) असे मयताचे नाव आहे. अथणी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अथणी येथील बसवेश्वर चौकात रोज सायंकाळी गर्दी असते. यावेळी ओव्हरटेक करताना खडी भरून निघालेल्या टिप्परने दुचाकीला धडक दिली. त्यात सागर मादर हा चाकात अडकून जागीच ठार झाला तर इरशाद सय्यद सनदी (वय 20, रा. किरणगी, ता. अथणी) आणि लखन गणपती मादर (वय 21, रा. ऐगळी, ता. अथणी) हे दोघे महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाले.
त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अथणी सरकारी दवाखान्यात प्रथमोपचारानंतर जखमींना मिरज येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अथणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.