fake-dummy-bogus-candidates-for-police-recruitment-exam-belgaum-202011.jpg | बेळगाव : डमी उमेदवारांना हॉल तिकीट देणाऱ्या मास्टरमाईंडला अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : डमी उमेदवारांना हॉल तिकीट देणाऱ्या मास्टरमाईंडला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कर्नाटक राज्य राखीव पोलिस दलामध्ये (KSRP Karnataka State Reserved Police केएसआरपी) कॉन्स्टेबल आणि आयआरबी नेमणुकीसाठी 22 नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेला डमी उमेदवारांना बसविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. बेळगाव शहरात 4 परीक्षा केंद्रांवर 4 डमी उमेदवारांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर उद्यमबाग व शहापूर पोलिसांनी मूळ उमेदवारांना अटक केली असून अद्याप दोघांचा शोध माळमारुती व टिळकवाडी शहर पोलिसांकडून घेण्यात येत आहे. KSRP दलातील कॉन्स्टेबल पदांसाठी घेण्यात आलेल्या सीईटीसाठी डमी उमेदवारांना तयार करणाऱ्या मुख्य संशयित लक्ष्मण परवण्णावर (रा. गोकाक) याला बंगळूर येथील बसवणगुडी पोलिसांनी अटक केली आहे.
तर हॉल तिकीट व इतर कागदपत्रे तयार करणारा मास्टरमाईंड बसवराज गुंड्यागोळ (रा. बिरनगड्डी, ता.गोकाक) याचा शोध घेण्यात येत आहे. लक्ष्मण परवण्णावर यांने विविध खात्यांमध्ये रिक्त असणाऱ्या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या पदांसाठीच्या परीक्षांमध्ये डमी उमेदवार बसवून लाखो रुपये उकळल्याची माहिती पोलिस चौकशीतून समोर आली आहे. बेळगाव परिसरात अनेक जणांकडून त्यांने परीक्षेला बसण्यासाठी पैसे दिले आहेत. यातून त्याने मोठी माया जमवली आहे. सीईटीतील अटक करण्यात आलेल्या डमी उमेदवार भीमाप्पा महादेव हुल्लोळी (वय 24 रा. हडीगनाळ ता. बैलहोंगल) याला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. अटक करण्यात आलेल्यांच्या चौकशीतून लक्ष्मण परवण्णवर व बसवराज गुंड्यागोळ यांची नांव पुढे आली आहेत.
बसवराज हा डमी उमेदवारांना परीक्षेसाठी तयार करत त्यांच्या नावे हॉल तिकीट तयार करुन देत असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. त्याच्यावर शहरात तसेच बंगळूर, चित्रदुर्ग आदी पोलिस स्थानकात त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बेळगावात पोलीस भरतीसाठी रविवारी झालेल्या परीक्षेत भीमशी महादेव हुल्लोळी (वय 24, रा. हडगीनहाळ, ता. गोकाक), सुरेश लक्ष्मण कडबी (वय 25, रा. बेनचिनमर्डी, ता. गोकाक), आनंद हणमंत वडेयर (वय 28, रा. उदगट्टी, ता. गोकाक), मेहबूब बाबासाब अक्किवाट (वय 23 रा. उदगट्टी, ता. गोकाक) या 4 डमी / बोगस परीक्षार्थींना अटक करण्यात आले होते.