police-van-siren.jpg | बेळगाव : 5 तोळे दागिन्यांसह रोकड पळविली | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : 5 तोळे दागिन्यांसह रोकड पळविली

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. चिकोडी : कोल्हापूर येथून माहेरी आलेल्या महिलेची 5 तोळे दागिन्यांसह रोकड असलेली पर्स चोरट्यांनी लांबविण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. बेडकिहाळ येथील आठवडा बाजारात मंगळवारी (1 डिसेंबर) सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे दीपाली प्रशांत अहिरेकर (रा. कोल्हापूर) महिलेला सुमारे अडीच लाखांचा फटका बसला. बाजारात अशाप्रकारे चोरीच्या घटना वाढल्यामुळे भीती व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बेडकिहाळ येथील मंगळवारचा आठवडा बाजार तीन आठवड्यांपासून गावात भरत आहे. दुपारी 4 पासून रात्री सुमारे 8 वाजेपर्यंत बाजार भरत आहे. बाहेरचे खरेदीदार, ग्राहक व विक्रेते यांच्यासह ऊस तोडणी मजूरही येत असल्याने मोठी गर्दी होत आहे. मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कन्नडशाळा ते मटण मार्केट परिसरात दीपाली या बाजारासाठी बहीण अर्चनासोबत आल्या होत्या.
दिवाळीनिमित्त त्या आपल्या माहेरी बाळासाहेब भाट यांच्या घरी आल्या आहेत. बाजाराला जाताना त्यांनी साडेतीन तोळ्याचे गंठण, अर्धा तोळ्याच्या रिंगा, अर्धा तोळ्याचे टॉप्स व मुलींच्या कानातील अर्धा तोळे असे सुमारे 5 तोळ्याचे दागिने व रोख 1,700 रुपये ठेवले होते. बाजारात गर्दीच्या वेळी पिशवीतील पर्स अज्ञाताने लांबविल्याचे निदर्शनास येताच त्यांनी एकच आक्रोश केला. या घटनेची नोंद सदलगा पोलिसांत केली आहे. याबाबत पोलिस अधिक चौकशी करत आहेत.