ram-mandir-temple-model.jpg | राम मंदिरासाठी मकरसंक्रांतीपासून घरोघरी जाऊन वर्गणी जमा केली जाणार वर्गणी; | belgaum news | belgavkar बेळगावकर

राम मंदिरासाठी मकरसंक्रांतीपासून घरोघरी जाऊन वर्गणी जमा केली जाणार वर्गणी;

belgavkar.com | belgaum | belgavkar

15 जानेवारीपासून वर्गणी; 10, 100 आणि 1,000 रुपयांचे कूपन

अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरू आहे. मंदिरासाठी रामभक्त आणि सर्वांचा हातभार लागावा यासाठी वर्गणी जमा केली जाणार आहे. विश्व हिंदू परिषद यासाठी एक मोहिम राबविणार असून याची सुरुवात नव्या वर्षात मकरसंक्रांतीच्या दिवसापासून होणार आहे. देशातील नागरिकांकडून ऐच्छिक स्वरुपात वर्गणी जमा केली जाणार आहे. यासाठी 10, 100 आणि 1,000 रुपयांचे कूपन तयार करण्यात आले आहेत. वर्गणी देणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला श्री रामाचा फोटो दिला जाणार असल्याचंही विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि रामजन्म भूमी तीर्थस्थानचे सचिव चंपत राय म्हणाले.
सचिव चंपत राय यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. अयोध्येत उभारलं जात असलेल्या भव्य राम मंदिरासाठी देशातील प्रत्येक रामभक्ताची मदत घेतली जाणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते घराघरात जाणार आहेत, असं चंपत राय म्हणाले. नव्या वर्षात मकरसंक्रांतीच्या म्हणजेच 15 जानेवारीपासून विहिंपचे कार्यकर्ते देशात घरोघरी जाऊन वर्गणी जमा करणार आहेत. देशातील 4 लाख गावांमध्ये जवळपास 11 कोटी कुटुंबियांपर्यंत पोहोचण्याची विहिंपची मोहीम आहे.
देशातील प्रत्येक जात, समाज आणि पंथाच्या नागरिकांचा देशातील या भव्य मंदिराला हातभार लागला पाहिजे, अशी यामागची संकल्पना असल्याचं चंपत राय यांनी सांगितलं. अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारण्याची तयारी सुरू आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि गुवाहटी येथील आयआयटी, सीबीआरआय, एल अँड टी, टाटाचे इंजिनिअर मंदिराच्या भक्कम पायाबाबतच्या आराखड्यावर काम करत असल्याचं चंपत राय यांनी सांगितलं.