बेळगाव शहरात 1 लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट : आमदार बेनके

बेळगाव शहरात 1 लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट : आमदार बेनके

belgavkar.com | belgaum | belgavkar

या उपनगरच्या विकासासाठी 29 कोटी

बेळगाव शहर ग्रीन व स्मार्ट सिटी बनविण्यासाठी महाविद्यालय, सरकारी कार्यालये, न्यायालय आवारात रोपे लावण्यात येतील. 1 लाख रोपे लावून शहर परिसरात हिरवाई निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले. आमदार बेनके यांनी वन विभागाच्या कार्यालयात वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरात 1 लाख रोपे लावण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. फळांची रोपे लावण्यावर भर देण्यात येणार असून यामुळे पक्षी आणि प्राण्यांना खाद्यान्न मिळेल.
तसेच रोपे भविष्यात मोठी होऊन त्यांच्या छायेमुळे रस्त्यावरून ये - जा करणाऱ्यांना विसावा मिळेल. हवामान थंड राहण्याबरोबरच प्रदूषण दूर होऊन शुध्द वातावरणनिर्मितीसही मदत होईल, असे आमदार बेनके म्हणाले.
रामतीर्थनगरच्या विकासासाठी 29 कोटी
रामतीर्थनगरात विकासकामे राबविण्यासाठी नगराविकास खात्याकडून 29.30 कोटींचे अनुदान मंजूर झाले आहे. या कामांसाठी निविदा मागविल्या असून, लवकरच कामाची सुरवात होणार असल्याची माहिती आमदार अनिल बेनके यांनी दिली आहे.
रामतीर्थनगरात सिमेंट काँक्रिटच्या गटारी, नाल्याची सुधारणा, रस्ते, शोभेचे दिवे बसविणे आदी कामे हाती घेतली जातील, असेही आमदार बेनके यांनी सांगितले. दरम्यान, रामतीर्थनगरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उदय स्कूल ते बसवेश्वर लेआऊट व पुढे केईबी जंक्शनपर्यंत बसविलेल्या पथदीपांचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले.
BUDA - Belgaum Urban Development Authority - बुडा - बेळगाव नगर विकास प्राधिकरण
यावेळी इरय्या खोत, अण्णासाहेब देसाई, श्री. करलिंगन्नवर, केदारी जोरापूर, व्ही. एस. गणाचारी, मंजुनाथ बजंत्री, शशी पारकर, संतोष जुमनाळ, अनिल सिद्दण्णवर, तमण्णा सबण्णावर, गिरीश गाणगेर, विनोद गणाचारी, नीळकंठ हेब्बाळ यांच्यासह स्मार्ट सिटी योजनेचे अधिकारी, रहिवासी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरात 1 लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट : आमदार बेनके
या उपनगरच्या विकासासाठी 29 कोटी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm