बेळगाव : प्रत्येक हिंदूंनी सुवर्ण सिंहासनासाठी निधी जमा करावा...

बेळगाव : प्रत्येक हिंदूंनी सुवर्ण सिंहासनासाठी निधी जमा करावा...

belgavkar.com | belgaum | belgavkar

मराठा गल्लीत खडा पहारा नोंदणी | 32 मण सुवर्ण सिंहासन | किल्ले रायगड

प्रत्येक हिंदूंनी आपले कर्तव्य समजून सिंहासनासाठी निधी जमा करावा. हे प्रत्येक हिंदूंचे कर्तव्य आहे : श्री उदय शिंदे
बेळगाव : किल्ले रायगड येथे स्थापित होणाऱ्या 32 मण सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी खडा पहारा योजनेची नोंदणी मराठा गल्ली, बेळगाव विभागातुन करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच पातशाह्या मातीत गाडून हिंदवी स्वराज्याचे तक्त निर्माण केले. 32 मण सुवर्ण सिंहासन निर्माण करून राज्याभिषेक करून घेतला. कालांतराने ते सोन्याचे सिंहासन मोघलांनी नष्ट केले. संभाजीराव भिडे गुरुजींच्या संकल्पनेतून ते पुन्हा स्थापित करण्याचा संकल्प श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानने केला आहे.
हे सिंहासन निर्माण झाल्यानंतर जगाचा हिंदुस्थानकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जाईल. हे सिंहासन निर्माण झाल्यानंतर त्याच्या रक्षणासाठी श्री शिवप्रतिष्ठान चे धारकरी आणि शिवभक्त खडा पहारा देण्यासाठी सज्ज आहेत. 1 तुकडी दररोज रायगड येथे पहारा देण्यासाठी सज्ज असेल. यासाठी किल्ले रायगडावर एक दिवस खडपहारा सेवा देण्यासाठी मराठा गल्ली, बेळगाव येथे नाव नोंदणी करण्यात आली.
हिंदूस्थानात 13 कोटी मराठे आहेत; त्यातील 13 लाख लोकांनी जरी 1 ग्रँम सोने दिले तरी 1300 किलो सोने जमेल. व्याख्याते श्री उदय शिंदे

मराठा गल्लीतील 35 धारकर्‍यांनी आपला रक्ताचा ठसा लावून आपली नावे नोंदवली.
भिडे गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे खडा पहारा नाव नोंदणी करून आम्ही आमचं कर्तव्य निभावल आहे, जी तारीख गुरुजी आम्हाला देतील त्या तारखेला आम्ही रायगडवर सेवेसाठी रुजू असू : मराठा गल्ली धारकरी


या कार्यक्रमात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर प्रमुख श्री अजित जाधव, वडगाव प्रमुख श्री पुंडलिक दादा चव्हाण यांनी खडापहारा सेवेबाबत माहिती दिली. मराठा गल्ली परिसरातील 35 हुन जास्त नागरिकांनी आपली नावे यावेळी नोंद केली. त्याचबरोबर एक दिवस रायगड सेवेसाठी संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमाला गल्लीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : प्रत्येक हिंदूंनी सुवर्ण सिंहासनासाठी निधी जमा करावा...
मराठा गल्लीत खडा पहारा नोंदणी | 32 मण सुवर्ण सिंहासन | किल्ले रायगड

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm