श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा अर्थातच गडकोट मोहीम 28 जानेवारीपासून

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा अर्थातच गडकोट मोहीम 28 जानेवारीपासून

belgavkar.com | belgaum | belgavkar

किल्ले विशाळगड ते पन्हाळगड मार्गे पावनखिंड

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्तगटाचे तरुण घडवणार्‍या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा अर्थातच गडकोट मोहीम 28 जानेवारी ते 31 जानेवारी 2021 या कालावधीत विशाळगड ते पन्हाळगड मार्गे पावनखिंड अशी होणार आहे.
छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज यांच्या विचारांची निस्वार्थी, देशभक्त पिढी घडवण्यासाठी पावनखिंडीमार्गे ही गडकोट मोहीम असणार आहे. 6 डिसेंबरला केवळ मोहिमेची घोषणा झाली होती. दिनांक घोषित झाली नव्हती. त्यामुळे प्रत्येक धारकरी, शिवप्रेमी डोळ्यांत प्राण आणून दिनांकाची वाट पहात होता. अखेर दिनांक घोषित झाल्याने धारकरी मोहिमेच्या पूर्वसिद्धतेला लागले आहेत.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे…
28 जानेवारी 2021 या दिवशी दुपारी 12 वाजता विशाळगडावरील नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी स्थानापाशी मोहिमेचा प्रारंभ होईल. श्री. तुळजाभवानीच्या आरतीनंतर दुपारी 12 वाजता मोहीम पन्हाळगडाकडे रवाना होईल. मोहिमेसाठी निश्चित केलेल्या शिदोरी आणि साहित्यासह उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे. मोहिमेचा समारोप 31 जानेवारीला होणार आहे. तरुण पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी तसेच त्यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवण्यासाठी शिवप्रतिष्ठानतर्फे गेली काही वर्षे गडकोट मोहिमेचे आयोजन केले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि हुतात्मे, स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने धारातीर्थे बनलेल्या गडकोटांच्या मोहिमात प्रतिवर्षी हजारो कार्यकर्ते सहभागी होतात.
समारोपाच्या प्रसंगी म्हणजे 31 जानेवारी या दिवशी प्रत्येकाने भगवा फेटा परिधान करावा.
मोहिमेसाठी प्रत्येकाने 8 वेळ पुरेल एवढी शिदोरी, जलकुंभ, पातळ सतरंजी-चादर आणणे आवश्यक आहे.
प्रत्येक धारकर्‍याने 50 रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे.
मोहिमेची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक धारकर्‍याने नित्य पळणे, जोर-बैठका, सूर्यनमस्कार असा व्यायाम तात्काळ चालू करावा, तसेच ‘राजा श्रीशिवछत्रपती’ ग्रंथाचे नित्य वाचन चालू करावे.
खडतर अशा मार्गातून दर्‍याखोर्‍यांमधून, खाचाखळण्यांमधून, उघड्यावर झोपणे, अविश्रांत चालणे, ऊन-वारा यांची तमा नाही. चार दिवस सर्व थरांमधील धारकरी एक येतात. त्यामुळे या मोहिमेची प्रत्येक धारकरी-शिवप्रेमी आतुरतेने वाट पहात असतात. अखेर या मोहिमेची घोषणा झाल्यामुळे धारकर्‍यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा अर्थातच गडकोट मोहीम 28 जानेवारीपासून
किल्ले विशाळगड ते पन्हाळगड मार्गे पावनखिंड

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm