murder-belgaum-civil-hospital-woman-security-guard-20201230-murder-civil-hospital.jpg | बेळगाव सिव्हील हाॅस्पिटलच्या आवारात युवतीचा निर्घृण खून | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव सिव्हील हाॅस्पिटलच्या आवारात युवतीचा निर्घृण खून

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहरातील सिव्हील हाॅस्पिटलच्या आवारात बुधवारी (30 डिसेबर) सकाळी 7.40 वाजण्याच्या सुमारास एका तरुणीवर प्रेमप्रकरणातून दुचाकीवरून आलेल्या प्रेमभंग प्रियकराने तलवारीने वार करून निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक माहितीनुसार सुधाराणी बसाप्पा हडपद (वय 27, रा. कंग्राळी खूर्द, बेळगाव, मूळ रा. मुगबसव, ता. बैलहोंगल)असे तिचे नाव आहे. सदर महिला ही जिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होती.
या प्रकारामुळे शहर परिसरात खळबळ माजली आहे. एकतर्फी प्रेमप्रकरण आणि आर्थिक व्यवहारातून हा खून झाला असल्याची चर्चा आहे. ही हत्या इराण्णा बाबू जगजंपी (वय 24, रा. आश्रय कॉलनी, जनता प्लॉट बैलहोंगल) नामक एका तरुणाने केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलिसांना घटनास्थळी युवतीच्या मृतदेहापासून काही अंतरावर रक्ताने माखलेली तलवार मिळाली आहे. पोलिसांनी संशयिताला अटकही केली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिस अधिक तपास करत आहेत.
मृतक सुधा आणि आरोपीचे प्रेम होते. त्यांच्यात विवाहाची बातचीतही झाली होती. त्यानंतर बाबू यांनी सुधाला इतर कोणाबरोबर फिरत असताना पाहिले होते. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संशयित आरोपी बाबूने सुधाशी लग्न केल्याचे सांगितले. आणि सुधाबरोबर आर्थिक व्यवहारही झाल्याचे सांगितले. बाबूने सुधाशी लग्न केल्यानंतर आणि तिला पैसे देऊनही ती दुसर्या एका व्यक्तीबरोबर फिरत असल्याने हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
मूळची मुगबसव येथील असलेल्या सुधाराणीचा सात वर्षांपूर्वी कित्तूर येथील तरुणाशी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना मूल झाले होते. त्या दोघांच्या बाळाचा नऊ महिन्यांतच एका आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर मुल नसल्याने सुधाचा नवरा आणि सासर परिवार तिला त्रास द्यायला लागले. तिला एक दिवस आग लावून जीवे मारण्याचा प्रयत्नही झाला होता. त्यानंतर सुधा माहेरी घरी परत आली आणि काही वर्षापूर्वी सिक्युरिटी गार्ड म्हणून बिम्स रुग्णालयात दाखल झाल्या. त्यानंतर काही वर्षांपूर्वी बेळगावात सुधाराणीची ओळख ईराण्णाशी झाली. त्यानंतर प्रागल प्रेमी हत्यारा तिच्यावर प्रेम करण्यास लागला. त्याने लग्न करण्याची धमकी दिल्याने सुधा गावी गेली. याची माहिती सुधाने पालकांनाही दिली होती. त्यामुळे पाच वर्षांपासून सुधाराणी ही आपल्या माहेरी मुगबसव येथे राहात होती. पती-पत्नीमधील हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून, तिने पोटगीसाठी दावा दाखल केला आहे. सध्या ती सिव्हील हॉस्पीटलमध्ये महिला व बाल चिकित्सा विभागाजवळ सुरक्षार क्षक म्हणून काम करीत होती. काल रात्री बाराच्या सुमारास हत्यारा प्रसूती प्रभागात आला होता. त्यानंतर त्याने मारण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर आज सकाळी सुधा हाॅस्पिटलच्या बाहेर येताच तलवारने त्याने सुधाला ठार मारले.
मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळी 8 या वेळेत सुधाराणी व तिची सहकारी गायत्री चिदानंद कलमठ (रा. तारीहाळ, सध्या शिवाजीनगर) या दोघी होत्या. सकाळी 8 वा. शिफ्ट संपण्यापूर्वी 7.30 वा. इराण्णा हा बाल रूग्ण विभागाच्या पाठिमागील बाजूला आला होता. यानंतर तो सुधाराणीशी काही सेकंदच बोलला व त्यानंतर त्याने तिच्यावर हल्ला केला.
सकाळी घडलेली सर्व घटना गायत्रीने पोलिसांसमोर कथन केली आहे. इराण्णा हा सकाळी 7.30 वा. येथे केए-22 एक्स-7300 वरून आला. यावेळी सुधाराणीने तिला तू पुढे चल माझ्या ओळखीचा एकजण आला आहे, त्याच्याशी बोलून येते. असे सांगितले. यानंतर गायत्री पुढे बघून चालू लागली. ती फर्लांगभर पुढे गेली असेल, तोच तिला सुधाराणीच्या किंचाळण्याचा आवाज आला. ती तशीच धावत मागे आली. यावेळी इराण्णा हा तिच्यावर तलवारीने वार करीत होता. ते पाहून गायत्री तिला वाचविण्यासाठी पुढे सरसावली. परंतु, बेफाम झालेल्या इराण्णाने तिला देखील तलवार दाखवली. त्यामुळे घाबरलेल्या गायत्रीने येथून पळ काढला व तिने ही माहिती तिने तिचे कंत्राटदार चेतन राजेंद्र हावलदार यांना दिली.
इराण्णा हा मूळचा बैलहोंगल येथील आहे. तीन वर्षांपूर्वी उडपीजवळील उळवी येथील श्रीकृष्ण मंदिराला गेल्यानंतर त्याची व सुधाराणीची ओळख झाली. दोघांची मैत्री व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून ते नेहमी एकमेकांच्या संपर्कात होते. यातूनच ही खुनाची घटना घडल्याची माहिती पोलिसांनी प्राथमिक तपासात दिली आहे.
इराण्णा हा मूळचा बैलहोंगल येथील आहे. तीन वर्षांपूर्वी उडपीजवळील उळवी येथील श्रीकृष्ण मंदिराला गेल्यानंतर त्याची व सुधाराणीची ओळख झाली. दोघांची मैत्री व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून ते नेहमी एकमेकांच्या संपर्कात होते. यातूनच ही खुनाची घटना घडल्याची माहिती पोलिसांनी प्राथमिक तपासात दिली आहे.
इराण्णाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गेल्या अडीच वर्षांपासून या दोघांचे एकत्र फिरणे होते. या काळात आपण तिच्यासाठी सुमारे दीड लाख रूपये खर्च केल्याचे इराण्णाचे म्हणणे आहे. परंतु, गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुधाराणी ही आपल्या भेटण्यास टाळाटाळ करीत होती. तसेच फोन देखील घेत नसल्याने इराण्णाचा तिच्यावर राग होता. याच रागातून बुधवारी सकाळी त्याने बेळगावात येऊन सुधाराणीवर तलवारीने हल्ला केला. यामध्ये ती जागीच ठार झाली.