बेळगाव : खानापूरातील त्या महिलेला मदत | फेसबुक फ्रेंड्स सर्कल

बेळगाव : खानापूरातील त्या महिलेला मदत | फेसबुक फ्रेंड्स सर्कल

belgavkar.com | belgaum | belgavkar

झाला होता जाळून मारण्याचा प्रयत्न..?

बेळगाव : खानापूर येथे भाजून जखमी झालेल्या आणि जिल्हा रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून उपचार घेणाऱ्या निराधार महिलेला फेसबुक फ्रेंड्स सर्कलकडून मदत करण्यात आली. भाजून जखमी झालेली महिला निराधार आहे. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र तिच्या सोबत तिचे कोणीही नातेवाईक नसल्याने सदर महिलेची परवड होत आहे. रुग्णालयातील डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार केले जात आहेत. मात्र मानसिक आधार नसल्याने सदर महिला अंथरुणाला खिळून आहे. याची दखल घेऊन फेसबुक फ्रेंडस्चे सदस्य संतोष दरेकर, संतोष डोण्याण्णवर, विनोद डोण्याण्णवर डॉ. प्रवीण डोण्याण्णवर यांनी वैद्यकीय मदत देऊन सहकार्य केले. जिल्हा रुग्णालयातील डॉ कार्तिक, डॉ. मेघा यांच्याकडून तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
विद्यानगर, खानापूर येथे वास्तव्यास असणाऱ्या महिलेला जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार खानापूर पोलिस स्थानकात झाली आहे. जखमी महिलेवर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शैला सनदी (वय 28, रा. विद्यानगर, खानापूर) असे भाजून जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तिला 6 वर्षाचा आकाश नावाचा मुलगा असून आईची स्थिती पाहून तो बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. तिला उपचारासाठी खानापूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र सदर महिलेसोबत कोणीच नसल्याने रुग्णालयातील डॉक्टरांकडून तिची देखभाल करण्यात येत आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिचा विवाह झाला होता. मात्र पतीने दुसऱ्या महिलेशी विवाह केल्याने घटस्फोट झाला होता. त्यानंतर चरितार्थ चालविण्यासाठी ती हॉटेलमध्ये कामाला जात होती.
यादरम्यान तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध निर्माण झाले. सर्व सुरळीत सुरु असताना 15 दिवसांपूर्वी प्रियकराचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार धरून आपल्याला मारहाण करून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे जखमी महिलेने तक्रारीत म्हटले आहे. सदर महिलेची देखभाल करणारे कोणी नसल्याने डॉक्टरकडून तिची देखभाल करण्यात येत आहे. तिचा 6 वर्षाचा आकाश नावाचा मुलगा या घटनेनंतर बेपत्ता आहे. आपल्या मुलाचा शोध घेण्याची मागणी सदर महिलेने सामाजिक कार्यकर्त्यांकडे केली आहे. सदर घटनेची नोंद खानापूर पोलिस स्थानकात झाली आहे. पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : खानापूरातील त्या महिलेला मदत | फेसबुक फ्रेंड्स सर्कल
झाला होता जाळून मारण्याचा प्रयत्न..?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm