बेळगाव : 'त्या' मृत शेतकरी महिलेच्या वारसदारांना आर्थिक मदत

बेळगाव : 'त्या' मृत शेतकरी महिलेच्या वारसदारांना आर्थिक मदत

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : मळणी मशीनमध्ये साडीचा पदर सापडून मृत्युमुखी पडलेल्या पाच्छापूर (ता. हुक्केरी) येथील महिलेच्या वारसदारांना आमदार सतीश जारकीहोळी यांनी आर्थिक मदत दिली आहे. आमदार जारकीहोळी यांची मुले राहुल व प्रियांका यांनी पाच्छापूरला भेट देऊन धनादेशाचे वितरण केले.
सोयाबिनची मळणी सुरू असताना यमनव्वा दुंडाप्पा उप्पार या महिलेच्या साडीचा पदर मळणी मशिनमध्ये सापडल्याने ती फरफटत जाऊन गतप्राण झाली होती. पाच्छापूर येथील शेतवडीत दोन महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. उप्पार कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्याने आमदार जारकीहोळी यांनी कुटुंबाला मदत देऊ केली. धनादेश वितरणाप्रसंगी काँग्रेस नेते अब्दुलगणी दर्गा, परशुराम उप्पार, नागप्पा उप्पार, कुमार गुडगनट्टी, रामचंद्र आवोजी, बाबू हिरेकोडी, केंपण्णा मुगळी, पांडू मण्णीकरी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 'त्या' मृत शेतकरी महिलेच्या वारसदारांना आर्थिक मदत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm