बेळगाव : किल्ले कलानिधी गडावर नववर्षाचं स्वागत अनोख्या पद्धतीने

बेळगाव : किल्ले कलानिधी गडावर नववर्षाचं स्वागत अनोख्या पद्धतीने

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : दुर्गवीर प्रतिष्ठानच्यावतीनं यंदा अनोख्या पद्धतीनं नववर्षाचं स्वागत करण्यात आलं आहे. देशभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सेलिब्रेशन होत असतानाच किल्ले कलानिधी गडावर देखील अनोख्या पद्धतीने नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. यंदा कलानिधी गड, कलानंदीगड किंवी काळानंदीगड या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील गडावरील शिवकालीन वस्तूंची स्वच्छता, गडाबाबत आणि दिशादर्शक फलक बसवण्यात आले. या मोहिमेत मोठ्या संख्येनं दुर्गवीर, युवक, युवती सहभागी झाले होते.

दुर्गवीरच्या शिलेदारांनी अतिशय मेहनत आणि जिद्दीने माहिती फलक उभे केले आहेत. किल्ल्यावर ठिकठिकाणी सूचना व महिती फलक लावण्यात आले आहेत. आपला अमूल्य वेळ, श्रम आणि पैसा खर्च करून हे दुर्गवीर गडाचे संवर्धन करतात. दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे दोन थर्टी फस्टला (31 डिसेबर 2020) जागता पहारा आणि श्रमदान करण्यात राबविण्यात आली. तसेच आज रविवारी आज पुन्हा श्रमदान मोहीम राबविण्यात आली.
मोहिमेत स्वच्छता करण्यासोबत गडावर फलक लावण्यात आले. हल्ली गडावर लोकांच येणं जाणं असत म्हणून गडावर प्रत्येक वास्तू व गडाच्या इतिहासाचे फलक लावण्यात आले, जेणेकरून गडावर येणाऱ्या प्रत्येक इतिहासप्रेमी पर्यटकाला त्याची माहिती मिळेल. गेली 6 वर्ष सातत्याने प्रत्येक रविवारी सुरू असलेल्या ह्या शिवकार्यात आपण ही सहभाग घेऊ शकता.
संपर्क : दुर्गवीर प्रतिष्ठान कलानिधीगड | सेवेचे ठाई तत्पर दुर्गवीर निरंतर
संपर्क : अभिजीत अष्टेकर, बेळगाव 97401 03131
नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी हौशी पर्यटक किल्ल्यावर आणि किल्याच्या पायथ्याशी येतात. दारू पिऊन तरूण धांगडधिंगा घालतात. यामध्ये अपघातही होतात. थर्टीफस्ट सेलिब्रेशनकरता बेळगाव, चंदगड, गोवा, कोल्हापूरसह अनेक ठिकाणाहून लोक येत असतात. यामुळे किल्ल्यावर किंवा पायथ्याशी लोकांची गर्दी असते. यामुळे किल्ल्याच नुकसाना होताना पाहायला मिळतं. तसेच गड परिसरात कचरा टाकून जात असल्याने गडाचं पावित्र्यही नष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी पहारा देण्यात आला होता.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : किल्ले कलानिधी गडावर नववर्षाचं स्वागत अनोख्या पद्धतीने

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm