ram-mandir-temple-model.jpg | बेळगाव : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निधी संकलनासाठी अभियान | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निधी संकलनासाठी अभियान

belgavkar.com | belgaum | belgavkar

नव्या वर्षात मकरसंक्रांतीपासून राम मंदिरासाठी वर्गणी जमा केली जाणार

बेळगाव : अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणाच्या कार्यात अधिकाधिक रामभक्तांचे योगदान व्हावे, यासाठी बेळगाव जिल्ह्यात 15 जानेवारीपासून निधी संकलन व संपर्क अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती रविवारी पत्रकार परिषदेत दिली. विश्व हिंदू परिषद 15 जानेवारीपासून हे अभियान सुरू करणार आहे. बेळगावातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशव कुंज या कार्यालयात प्रसारमाध्यम प्रतिनिधींना यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषद यासाठी एक मोहिम राबविणार असून याची सुरुवात नव्या वर्षात मकरसंक्रांतीच्या दिवसापासून होणार आहे.
कर्नाटकातील 27,500 गावांमधील रामभक्तांच्या 90 लाख घरांना भेट देत निधी जमविला जाणार असल्याचे विहिंपचे विभागीय संघटन सचिव केशव हेगडे यांनी म्हटले आहे. कर्नाटकातून नेमका किती निधी एकत्रित करण्यात येणार हे मात्र त्यांनी सांगितले नाही. निधी संकलनासाठी रामसेवक, कार्यकर्ते निधी समर्पणजमा करणार आहेत. यात जमेल तेवढा निधी प्रत्येक कुटुंबाला समर्पित करता यावा, यासाठी 10 रुपये, 100 व 1,000 रुपयांची कूपन्स काढण्यात आली आहेत. या कूपन्सवर काढण्यात आलेली श्रीराम मंदिराचे आकर्षक चित्रही कूपनद्वारे घरोघरी जाणार आहे. वर्गणी देणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला श्री रामाचा फोटो दिला जाणार असल्याचंही राय म्हणाले. या अभियानासाठी देशभरात राम सेवाकाच्या बैठका घेण्यात आल्या आहेत.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून भगवान रामाचे मंदिर उभारण्यात येणार असून याकरिता 1,100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगत हेगडे यांनी हा निधी स्वयंप्रेरणेने देणे अपेक्षित असून याकरिता कुठलेच लक्ष्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. श्रीराम मंदिर उभारणीसाठी शासकीय निधीचा वापर न करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. भगवान रामावर श्रद्धा असलेले भाविक किमान 10 रुपयांपासून देणगी देऊ शकतात. निधी संकलक 2,00 रुपयांपेक्षा अधिक देणगीसाठी संबंधिताला पावती सोपविणार आहे. जमविण्यात येणारा निधी संबंधित उद्देशासाठीच खर्ची पडेल याची खातरजमा केल्याचे हेगडे म्हणाले. पुढील 3-4 वर्षांमध्ये भव्य मंदिर उभे राहण्याची आशा आहे. मंदिर उभारणीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियातील बचत खाते क्र. 39161495808 (आयएफएससी कोड : SBIN0002510) यावर देणगी जमा करू शकतात. देणगीकरिता भाविकांना कलम 80 जी (2) (B) अंतर्गत प्राप्तिकरात सवलत मिळू शकते, असे त्यांनी म्हटले आहे.
नाव : राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट
बैंक अकाउंट नंबर : 39161495808
IFSC कोड : SBIN0002510 (फैजाबाद, अयोध्या)
अयोध्येतील राममंदिर परिसराच्या विकासासाठी अंदाजे 1,100 कोटी रुपयांचे बजेट निर्धारित केले असून, यातील 300 ते 400 कोटी रुपये मंदिराच्या बांधकामात खर्च होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली आहे. अयोध्येचा विकास विश्वाची सांस्कृतिक राजधानी अशा तऱ्हेने केला जाणार आहे. कोरोना संक्रमणामुळे बाधित झालेले काम आता सुरू झाले असून, साडेतीन वर्षात पूर्ण होईल. बांधकामात राजस्थानातील दगडांचा समावेश होणार असून, आंदोलनादरम्यान जमा झालेल्या विटांचा उपयोग भूभाग सपाट करण्यासाठी होणार आहे. मंदिराच्या बाहेर 108 एकरांचा भाग विकसित केला जाणार असून, तेथे डिजिटल लायब्ररी, प्राथमिक आरोग्य केंद्र, संग्रहालय, मंदिर आंदोलनात बलिदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्मारक आदींची उभारणी केली जाईल. प्रभू रामचंद्रांना वैश्विक विनयाचे प्रतीक म्हणून उभारले जाणार आहे. त्यासाठी शेजारील देशांतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करून त्यांना श्रीरामाच्या आदर्शाचा पाठ पढविला जाईल, असे गोविंददेव गिरी यावेळी म्हणाले.