बेळगाव : कंग्राळी खुर्द | शाळेमध्ये सॅनीटायझर आणि मास्कचे वाटप

बेळगाव : कंग्राळी खुर्द | शाळेमध्ये सॅनीटायझर आणि मास्कचे वाटप

belgavkar.com | belgaum | belgavkar

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कंग्राळी खुर्द बेळगाव

बेळगाव : कंग्राळी खुर्द (ता. बेळगाव) येथील आदर्श मराठी प्राथमिक शाळा, कन्नड शाळा आणी मार्कंडेय हायस्कूल या शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, कंग्राळी खुर्द विभागाकडून मोफत सॅनीटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले. कोविड-19 च्या काळात बंद असलेल्या शाळा 1 जानेवारीपासून सुरु करण्यात आल्या आहेत. मुलांच्या सुरक्षेसाठी गावातील धारकरीबंधुनी हा उपक्रम हाती घेतला.
यावेळी मनोहर पाटील, महादेव दिंडे, भाऊराव पाटील, नारायण पाटील, विनायक पाटील, प्रशांत पाटील, यशोधन तुळसकर, अमित, सुहास, विनायक, प्रेम आणी इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व नियमांचे पालन करून शिक्षण प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थीसुद्धा आवडीने शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून सॅनीटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आलं. यावेळी गावातील तिन्ही शाळांच्या मुख्याध्यापाकांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले व या कार्याची प्रशंसा केली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कंग्राळी खुर्द | शाळेमध्ये सॅनीटायझर आणि मास्कचे वाटप
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कंग्राळी खुर्द बेळगाव

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm