बेळगाव : कंग्राळीच्या धारकऱ्यांच सुवर्ण सिंहासन व राम मंदिरासाठी सायकल वरून जोतिबा देवाला साकडं...

बेळगाव : कंग्राळीच्या धारकऱ्यांच सुवर्ण सिंहासन व राम मंदिरासाठी सायकल वरून जोतिबा देवाला साकडं...

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव :- कंग्राळी खुर्द (ता. बेळगाव) येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या धारकऱ्यांनी सायकल वरून कोल्हापूर येथील जोतिबा देवाला किल्ले रायगड वर होणाऱ्या छञपती शिवाजी महाराजांचे 32 मन सुवर्ण सिंहासन व अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिरच्या निर्माणासाठी साकडं घातलं. कंग्राळी खुर्द येथून भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची पूजा करून सायकल घेऊन या गावातीलधारकरी संदेश पाटील, सौरभ पाटील, कार्तिक पाटील (सर्वजण रा. पाटील गल्ली) तसेच ओमकेश जाधव (रा. जाधव गल्ली), प्रशांत कामुचे (रा. पावशे गल्ली) या सर्वांनी सायकलवरून प्रवास केला.
किल्ले रायगडावर 32 मण सुवर्ण सिंहासन चे काम लवकरात लवकर पूर्ण होवो तसेच अयोध्या येथे चालू असलेल्या राम मंदिरा निर्माणाचे काम सुद्धा लवकरच पूर्ण होवो या मागणीसाठी कोल्हापूर येथील जोतिबा मंदिर गाठलं व व ज्योतिबा देवाचे दर्शन घेऊन पन्हाळगड व अंबाबाई मंदिर येथे जाऊन दर्शन घेतलं. आज ते परत कंग्राळी खुर्द येथे ते पोहोचले. या सर्वांचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व कंग्राळी खुर्द ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कंग्राळीच्या धारकऱ्यांच सुवर्ण सिंहासन व राम मंदिरासाठी सायकल वरून जोतिबा देवाला साकडं...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm