कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तार विस्तार होण्याचे संकेत;

कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तार विस्तार होण्याचे संकेत;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव जिल्ह्यातील आमदाराला मंत्रिपदाची लॉटरी लागणार.?

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी रविवारी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर सुमारे एक तास चर्चा केली. मंत्रिमंडळ विस्तार, लोकसभा व विधानसभेची पोटनिवडणूक, पक्ष संघटना यावर सविस्तर चर्चा झाली, परंतु भाजप हायकमांडने मुख्यमंत्र्यांच्या अपेक्षेप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तारास अद्याप हिरवा कंदील दाखविला नाही, मात्र लवकरच या संबंधी गोड बातमी मिळेल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
वर्षभरापासून रेंगाळत पडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला आणि पुनर्रचनेला संक्रांतीचा मुहूर्त मिळाला आहे. 7 आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे, तर 5 मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. हुक्केरीचे आमदार आणि माजी मंत्री उमेश कत्ती यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. संभाव्य मंत्र्यांच्या यादीत त्यांचे नाव आहे. संक्रांतीआधीच विस्तार होण्याचे संकेत आहेत.
विशेष म्हणजे नेतृत्व बदलावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शहा 16 जानेवारीला कर्नाटकाच्या भेटीवर येत आहेत. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री येडियुरप्पा देशाच्या राजधानीत एक दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. रविवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी पक्षाचे नेते अमित शहा वजे.पी.नड्डा यांची भेट घेतली व सविस्तर चर्चा केली.
कोण येणार, कोण जाणार ? आमदार उमेश कत्ती (हुक्केरी, बेळगाव), एस. सुनीलकुमार (कार्कळ), अरविंद लिंबावळी (महादेवपूर), बसनगौडा पाटील यत्नाळ (विजापूर), एम. पी. रेणुकाचार्य (होनाळी), तिप्पारेड्डी (चित्रदुर्ग) यांच्यासह विधान परिषद सदस्य एमटीबी नागराज, आर.शंकर, सी. पी. योगेश्वर, यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सी. सी. पाटील, कोटा श्रीनिवास पुजारी, प्रभू चव्हाण आदींना मंत्रिपद सोडावे लागण्याची शक्यता आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तार विस्तार होण्याचे संकेत;
बेळगाव जिल्ह्यातील आमदाराला मंत्रिपदाची लॉटरी लागणार.?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm