बेळगाव लोकसभा | पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी आपण बांधील;

बेळगाव लोकसभा | पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी आपण बांधील;

belgavkar.com | belgaum | belgavkar

प्रकाश हुक्केरी यांनी केली अचानक उमेदवारी देण्याची मागणी;

बेळगाव : केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लवकरच होणार आहे. निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निश्चित करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कार्यालयात बैठक झाली. निवड समितीने प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळींचा बैठकीत प्रस्ताव ठेवला असतानाच चिकोडीचे (जि. बेळगाव) माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी अचानक आपणास उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. बेळगाव लोकसभेसाठी प्रकाश हुक्केरी यांचेही नाव काँग्रेस पक्षाकडून गेले आहे. पण, पक्ष जो निर्णय घेईल त्याला बांधील राहू, असे प्रतिपादन त्यांचे चिरजींव आणि हुक्केरीचे आमदार गणेश हुक्केरी यांनी केले.
अंकली, जोडकुरली येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास मदतीचा धनादेश वितरण आणि विविध रस्ते उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार हुक्केरी म्हणाले, आमचे वडील व ज्येष्ठ नेते प्रकाश हुक्केरी यांचे नाव पक्षाकडून गेले आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, एम. बी. पाटील यांच्याकडे बेळगाव लोकसभेसाठी तीन नावे दिली आहेत. उमेदवारी कुणाला द्यावी, हा निर्णय पक्ष घेईल. पक्ष जो निर्णय घेईल, त्याला आम्ही बांधील आहे. शनिवारीच प्रकाश हुक्केरी यांनी बंगळूरच्या पक्ष बैठकीत बेळगाव लोकसभेसाठी उमेदवारी मागणी केली होती. यापूर्वी त्यांनी अंगडी यांच्या कुटुंबातील सदस्या उमेदवारी दिल्यास पक्ष न बघता प्रचार करण्याचे विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर आमदार हुक्केरी यांनी भूमिका स्पष्ट केली.
बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. परंतु ही प्रतिष्ठेची जागा जिंकण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने आधीच हालचाली सुरू केल्या आहेत.
हुक्केरीचे आश्चर्यकारक विधान : प्रकाश हुक्केरी काँग्रेस पक्षातून अनेकदा विधानसभेवर निवडून आले आहेत. चिकोडी लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेत निवडून गेले. त्यांचे पुत्र गणेश हुक्केरीही काँग्रेसमधूनच विधानसभेत विजयी झाले आहेत. प्रकाश हुक्केरी यांना काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाते. परंतु, काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपने अंगडी यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिल्यास भाजपसाठी प्रचार करणार असल्याचे आश्चर्यकारक वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. आता त्यांनी अचानक उमेदवारीची मागणी केली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव लोकसभा | पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी आपण बांधील;
प्रकाश हुक्केरी यांनी केली अचानक उमेदवारी देण्याची मागणी;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm