बेळगाव : 32 मन सुवर्ण सिंहासनासाठी 1 लाख रुपयांचा कर्तव्यनिधीचा | शिंदोळी गाव ग्रामस्थ

बेळगाव : 32 मन सुवर्ण सिंहासनासाठी 1 लाख रुपयांचा कर्तव्यनिधीचा | शिंदोळी गाव ग्रामस्थ

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावामध्ये 32 मण सुवर्ण सिंहासनाचे महत्व आणि खडा पहारा म्हणजे काय व कशासाठी तसेच ह्या वर्षीची गडकोट मोहीम ( श्री विशाळगड ते श्री पन्हाळगड मार्गे पावनखिंड) या विषयांवरती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यानिमित्ताने समस्थ शिंदोळी ग्रामस्थ व धारकरी यांच्यावतीने स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर होणाऱ्या 32 मन सुवर्ण सिंहासनासाठी रुपये 1,01,101 /- (एक लाख एक हजार एकशे एक रुपये) इतका कर्तव्यनिधीचा धनादेश श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव जिल्हाप्रमुख श्री किरण गावडे, तालुका प्रमुख परशुरामभाऊ कोकितकर, विभाग प्रमुख कपील पाटील, प्रवीण मुरारी व हिरामनी मुचंडीकर तसेच गावांतील नागरिक, धारकरी, शिवभक्त, हिंदू कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्ग रायगड येथे स्थापन होणार्‍या छञपती श्री शिवाजी महाराजांच्या 32 मन सुवर्ण सिंहासन संकल्प व खडा पहारा नियोज बाबत हिंदु बांधवामध्ये जनजागृती व्हावी यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. पाचहि पातशाह्या मुघल, पोर्तुगीज, डच, ईंग्रज व सिद्दी या परकिय आक्रमकांच्या तावडितुन हिंदुस्थानमध्ये कित्येक शतकांच्या नंतर हिंदुचे सुवर्ण सिंहासन स्थापन झाले ते फक्त श्री कृपेने असे खुद्द शिवरायांनी म्हटले आहे. ते आपले हिंदुचे, हिंदुस्थानचे सिंहासन परत श्री रायगडावर स्थापन करायचा संकल्प श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांनी धारकर्‍यांना दिला आहे. म्हणुन त्या संकल्प पुर्तीसाठी जनजागृती करण्यात येत आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे रायगडावर 32 मण सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापित करण्याचा संकल्प श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे करण्यात आला आहे. श्रीरायगडावर पुढील काही काळातच संकल्पित केलेले 32 मण सुवर्ण सिंहासन सर्वांच्या अथक दृढसंकल्पबद्धतेतून साकार होणार आहे. या करीता संपूर्ण महाराष्ट्र सोबतच आपल्या हिंदूस्थानातील अनेक जिल्ह्यातून सर्व धारकरी व शिवभक्त सिंहासनासाठी लागणारा कर्तव्यनिधी संकलनासाठी अथक प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर खडा पहारा नोंदणी करत आहे. श्रीरायगडावर हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम सुवर्ण सिंहासनाच्या पूर्णस्थापनेच्या दुस-या क्षणा पासून खडा पहा-याची आवश्यकता लागणार आहे. प्रत्येक दिवशी एका तालुक्यातील किमान 2000 जण श्रीरायगडावर खडा पहारा देणार आहेत. वर्षभरातील सांगेल त्या एकाच दिवंशी एकाच वेळी स्वतःची भाजी-भाकरी घेऊन तरणी-ताठ वाघाच्या काळजाची पोरं स्वखर्चाने जाऊन पहारा देणार आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 32 मन सुवर्ण सिंहासनासाठी 1 लाख रुपयांचा कर्तव्यनिधीचा | शिंदोळी गाव ग्रामस्थ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm