बेळगावच्या आमदारांची नाराजी; 7 नव्या मंत्र्यांनी घेतली शपथ; कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तार;

बेळगावच्या आमदारांची नाराजी;
7 नव्या मंत्र्यांनी घेतली शपथ;
कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तार;

belgavkar.com | belgaum | belgavkar

पैसे घेऊन मंत्रिपद वाटत असल्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरून भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या काही आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले असून मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ब्लॅकमेलिंग करणाऱ्या आणि पैसे देण्याऱ्यालाच मंत्रिपद दिले जात आहे, असा आरोप विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यतनाल यांनी केला आहे. यामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आमदार बसनगौडा यतनाल यांनी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे असा सल्लाही दिला आहे. जो कोणी ब्लॅकमेलिंग करतो किंवा जास्त पैसे देतो त्याला मंत्रिपद दिले जात आहे. यासाठी एक सीडी कोटा आणि सीडी प्लस कोटा आहे, असा आरोपही आमदार यतनाल यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना सीडीची भिती दाखवून ब्लॅकमेल केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
आमदार बसनगौडा यतनाल यांच्यासह बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, आमदार कालाकप्पा बंदी यांनीही मंत्रिमंडळ विस्तारावर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षनेतृत्वाने मंत्रीमंडळ विस्तारातही आमदार अभय पाटील यांना डावलल्याने ते नाराज झाल्याची चर्चा आहे.
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी Tweet करुन नाराजी व्यक्त केली आहे : पक्षामध्ये स्थान आणि मान मिळवण्यासाठी अन्य मार्गाचा अवलंब न करता निष्ठावंत मार्गाने काम केलेल्या आणि विचारांची भद्रता असलेल्या कार्यकर्त्यांना सध्याच्या काळात पक्षात कोणतेही स्थान नसल्याने हे खेदजनक आहे. आमदारांनी मंत्रिमंडळ विस्तारावर नाराजी व्यक्त केली आहे.
मी पक्षाचा निष्ठावंत शिपाई असून या मंत्रिमंडळ विस्ताराने मला आनंद झालेला नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे आमदार कालाकप्पा बंदी म्हणाले. तसेच – सुनील कुमार, सतीश रेड्डी, रेणुकाचार्य, एमएलसी विश्वनाथ, अभय पाटिल, अरविंद बेलाड या आमदारांनी देखील उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये आज सायंकाळी मंत्रिमंडळ विस्तार झाला असून 7 नव्या मंत्र्यांना शपथ दिली गेली.
हुक्केरीचे (जि. बेळगाव) आमदार आणि माजी मंत्री उमेश कत्ती
बिल्गीचे आमदार मुरुगेश निराणी
विधानपरिषदेचे सदस्य एमटीबी नागराजू, सीपी योगेश्वर आणि आर शंकर उर्फ ​​पेंडुलम शंकर
महादेवपुराचे आमदार अरविंद लिंबवल्ली
सुलियाचे आमदार एस अंगारा

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावच्या आमदारांची नाराजी; 7 नव्या मंत्र्यांनी घेतली शपथ; कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तार;
पैसे घेऊन मंत्रिपद वाटत असल्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm