बेळगाव : ट्रकच्या धडकेत हलगा-बस्तवाडचा युवक ठार

बेळगाव : ट्रकच्या धडकेत हलगा-बस्तवाडचा युवक ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने युवक घटनास्थळी जागीच ठार झाल्याची घटना पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग-4 वरील हलग्याजवळ घडली आहे. आकाश पाटील (वय 22 रा. बस्तवाड हलगा) असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. गुरुवारी (14 जानेवारी) सायंकाळी 7.15 वाजता हा अपघात घडला आहे.
माहितीनुसार, आकाश हा दुचाकी वरून हायवेवरून बस्तवाडकडे जात असतेवेळी हलगा ब्रिजवर पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिली. त्यात आकाशच्या डोक्याला जबर मार बसला. अपघातात घटनास्थळी युवकाचा मृत्यू झाला. हिरेबागेवाडी पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : ट्रकच्या धडकेत हलगा-बस्तवाडचा युवक ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm