dharwad-accident-between-tempo-traveller-and-tipper-near-dharwad-11-dead-20210115-dwd.jpg | धारवाड अपघात : NH4 वर गोव्याला जाताना भीषण अपघातात 13 जण ठार | belgaum news | belgavkar बेळगावकर

धारवाड अपघात : NH4 वर गोव्याला जाताना भीषण अपघातात 13 जण ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

अखेरचा सेल्फी ठरला..... Go goa with School buddies

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

संक्रांत साजरी करण्यासाठी गोव्याला जाताना भीषण अपघात, 11 महिलांचा मृत्यू

धारवाड : आज शुक्रवारी (15 जानेवारी) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास NH4 वर धारवाड तालुक्यातील ईट्टगट्टी गावाजवळ हुबळी-धारवाड बायपास रोडवर समोरुन दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 13 जण ठार झाले आहेत. दावणगिरीहून गोव्याला जाणारी मिनी बस (KA 64-1316) आणि बेळगावहून हुबळीकडे जाणाला टिप्परमध्ये हा अपघात झाला. बसमधील 11 महिलांचा मृत्यू झाला आहे आणि काहींची प्रकृती गंभीर आहे. तर बस चालक व वाहकाचा मृत्यू झाला आहे.
dharwad-accident-between-tempo-traveller-and-tipper-near-dharwad-11-dead-20210115-dharwad.jpg | धारवाड अपघात : NH4 वर गोव्याला जाताना भीषण अपघातात 13 जण ठार | belgaum news | belgavkar बेळगावकर
मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी दावणगिरिच्या सेंट पाँल शाळेच्या मैञीणी असलेल्या 17 महिला गोव्याला निघाल्या असताना काळाने घाला घातला. सर्वजण मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी तीन दिवस गोव्याच्या दौर्‍यावर निघाल्या होत्या. विद्यानगर, दावनगिरीतील महिलांच्या क्लबच्या त्या सदस्या होत्या. पहाटे 3 वाजताच्या सुमारास टिप्परने टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिली. या अपघातात 10 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रवासात झोपलेल्या असतानाच महिलांवर संक्रांत कोसळली. गोव्याला पोहोचण्यापूर्वी धारवाडजवळच भीषण अपघातात 11 जणींना प्राण गमवावे लागले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व दावणगिरी जिल्ह्यातील असून ते गोव्यात एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी जात होते.
धारवाड ग्रामीण स्टेशन पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे. जखमींना किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनूसार या महिला डाँक्टर असल्याची शक्यता आहे. धारवाड ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक महेंद्रकुमार यांच्या उपस्थितीत टेम्पो गाडीमध्ये अडकलेले दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातात 4 महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर हुबळीतील किम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोघी जणींना किरकोळ दुखापत झाली आहे. माजी आमदार व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष गुरूसिद्मनागौडा यांचे सुनेचेही निधन झाले. प्रीती रविकुमार (वय 46) याचा मृत्यू झाला आहे. प्रीती ही पेशाने डॉक्टर असून ती धारवाडमधील केअर हॉस्पिटलमध्ये कार्यरत होती.
प्रिती रविकुमार (वय 46), परमज्योती शशिधर हुंचूर (वय 47), वर्षिका विरेश (वय 46), मंजुळा नटेश जे. बी. (वय 47), राजेश्वरी शिवकुमार बंडमण्णवर (वय 46), डॉ. वीणा प्रकाश मट्टीहळ्ळी (वय 47), क्षीरा सुरेशबाबू फेराळ (वय 21), हेमलता उर्फ मानसी कल्लाप्पा (वय 48), आशा जगदीश बेतूर (वय 47), वेदा मंजुनाथ (वय 46), उषाराणी रमेश (वय 46, सर्वजण रा. दावणगेरी), वाहक मल्लिकार्जुन उडगट्टी (वय 27, राणेबेन्नूर) व बसचालक राजू सोमप्पा गोरबण्णावर (वय 38, रा. राणेबेन्नूर), अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर पौर्णिमा सुरेशबाबू (वय 46), प्रवीणा प्रकाश (46, रा. बंगळूर), टिप्परचालक बसवराज इराप्पा काद्रोळी (वय 25, रा. उगरखोड ता. कित्तूर) अशी जखमींची नावे आहेत.
शुक्रवारी पहाटे महिलांचा एक गट धारवाडहून गोव्यात जात होता. यावेळी टिप्पर टेम्पोची धडक झाली.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने शुक्रवारी ट्विट केले आणि म्हटले आहे की, कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात रस्ता अपघातामुळे झालेल्या जीवितहानीमुळे दु: ख झाले आहे. या दुःखद घटनेत मी शोकग्रस्त कुटुंबियांसमवेत आहेत. जखमींच्या त्वरित पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो.
PMO India @PMOIndia
Saddened by the loss of lives due to a road accident in Karnataka’s Dharwad district. In this sad hour, my thoughts are with the bereaved families. I pray for a quick recovery of those injured: PM @narendramodi