बेळगावात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची जाहीर सभा; होणार कोअर कमिटीची बैठक

बेळगावात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची जाहीर सभा;
होणार कोअर कमिटीची बैठक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 17 जानेवारीला बेळगावमध्ये सभेसाठी येत आहेत. त्यांच्या सभेसाठी युद्धपातळीवर नियोजन करण्यात येत आहे. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह बेळगावच्या आमदारांनी शहा यांची सभा होणार्‍या जिल्हा क्रीडांगणाची पाहणी केली. अमित शहा यांची रविवार 17 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता सभा होणार आहे. यावेळी माजी आमदार भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, धनंजय जाधव, भाजप शहर जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
दुपारी होणार्‍या जनसेवक मेळाव्याच्या बरोबरीने त्यांच्या उपस्थितीत भाजप कोअर कमिटीची बैठक देखील होणार आहे. त्यामुळे अमित शहा यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांच्या दौर्‍याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी माध्यमांना ही माहिती दिली. 17 रोजी सकाळी 10.30 वाजता सांबरा विमानतळावर अमित शहा यांचे आगमन होणार आहे. तेथून ते बागलकोट येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रवाना होणार आहेत. बेळगावात आल्यानंतर जिल्हा क्रीडांगणावरील जनसेवक मेळाव्यात दुपारी 3 नंतर त्यांची मुख्य उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर ते माजी केंद्रीय मंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या निवासस्थानी जावून त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्याचप्रमाणे भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक देखील त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
शहा यांच्या सभेला दोन ते अडीच लाख लोखांची उपस्थिती अपेक्षित आहे. त्यानुसार सभेचे नियोजन करण्यात यावे, अशी सूचना जारकीहोळी यांनी पोलिस आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी दिल्या. भाजपच्या पदाधिकार्‍यांनी सभेसाठी येणार्‍या लोकांचे नियोजन करावे. त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. समारंभाला जाण्यासाठी एकूण 4 प्रवेशद्वार करण्यात आले आहेत. एक प्रवेशद्वार हा महनीय व्यक्तींसाठी असून इतर तीन प्रवेशद्वार हे सामान्य जनतेसाठी आहेत. प्रवेशद्वारावर सर्व नागरिकांना सॅनिटाईझ करण्यात येणार आहे. सभेमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यात येणार आहे. सभास्थळी दुपारी 12 वाजल्यापासून नागरिकांना सोडण्यात येणार असून नागरिकांनी शिस्तीचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची जाहीर सभा; होणार कोअर कमिटीची बैठक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm